शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

४१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह;१६ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 11:18 IST

जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा एक हजार १०१ वर पोहोचला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : बुधवारी जिल्ह्यास प्राप्त झालेल्या ३२९ अहवालांपैकी ४१ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे तर २८६ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा एक हजार १०१ वर पोहोचला आहे.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे करण्यात आलेल्या तपासणीत ही बाब समोर आली. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोग शाळेतील तपासणीमध्ये २१ अहवाल तर रॅपीड टेस्टमद्ये २० जणांच्या अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ६३ तर रॅपिड टेस्टमधील २२३ अहवालांचा समावेश आहे.पॉझिटिव्ह अहवालामध्ये सिंदखेड राजा तालुक्यातील आडगाव राजा येथील एक महिला, मेहकर मधील तीन, लोणी गवळी येथील तीन, डोणगाव येथील सात, जळगाव जामोद येथील एक, देऊळगाव राजा येथील दोन, असोला जहांगीर येथील तीन, खामगावमधील सहा, चिखली येथील १२, जनुना येथील एक, मलकापूर येथील दोन अशा ४१ जणांचा यात समोश आहे.दरम्यान, मंगळवारी १६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना वैद्यकीय संकेतानुसार रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये नांदुरा येथील दोन, मलकापूर येथील लखानी चौकातील एक महिला, चिखली शहरातील आनंद नगरमधील दोन जण, जळगाव जामोद येथीलही दोन, खामगावातील सात, नांदुरा तालुक्यातील खालखेड येथील एका महिलेचा समावेश आहे.दुसरीकडे आतापर्यंत संदिग्ध रुग्णांपैकी सात हजार ७५१ संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले असून आजपर्यंत ६८८ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या १८४ संदिग्ध रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा असून २९ जुलै रोजी हे अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या एक हजार १०१ झाली असून ३८६ जणावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या सातत्याने वाढत असून जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या