शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील ६८१ ग्रामसेवकांचा पीक कापणी प्रयोगाला नकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 14:02 IST

यंदाच्या पीक कापणी प्रयोगाच्या कामासाठी जिल्ह्यातील ६८१ ग्रामसेवकांची नकारघंटा असल्याने कृषी विभाग अडचणीत सापडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: खरीप हंगामामध्ये विविध पिकांच्या उत्पादनाचा अंदाज घेण्यासाठी कृषी व महसूल विभागातर्फे पीक कापणी प्रयोग राबविण्यात येतो. परंतू यंदाच्या पीक कापणी प्रयोगाच्या कामासाठी जिल्ह्यातील ६८१ ग्रामसेवकांची नकारघंटा असल्याने कृषी विभाग अडचणीत सापडला आहे. या प्रयोगासाठी प्रशिक्षण व तांत्रिक ज्ञान मिळत नसल्याने या कामावर बहिष्कार असल्याचा ग्रामसेवक संघटनांचा दावा आहे.राज्यातील विविध पिकांच्या उत्पादनासंदर्भातील प्रत्यक्ष शेतात निवड केलेल्या प्लॉटवर पीक कापणी प्रयोग राबविल्या जातो. यामध्ये कापूस, तूर, सोयाबीन यासारख्या पिकांचा समावेश असतो. यामध्ये कृषी, महसूल तसेच शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कापणी अहवालानुसार उत्पादन ठरविण्यात येते. पिकांच्या कापणी अहवालामध्ये हेक्टरी उत्पादनानुसार जिल्ह्याच्या विविध भागातील अंदाज घेण्यात येतात. पीक कापणी अहवालानुसार संपूर्ण जिल्हानिहाय माहिती कृषी विभागाने तयार केलेल्या अ‍ॅपवर टाकण्यात येते. त्यानंतर राज्यातील पिकांच्या उत्पादनाबाबतचा अहवाल तयार करण्यात येतो. पीक कापणी अहवालानुसार मंडळात झालेले उत्पादन, त्याला मिळणारा हेक्टरी हमी भाव तसेच पीक विम्याचा लाभ सुद्धा या नुसार देण्यात येतो. यावर्षीच्या पीक कापणी प्रयोगाला जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी नकार दर्शवला आहे. खरीप हंगाम २०१९ मध्ये पीक कापणी प्रयोगाच्या कामावर बहिष्कार टाकून संबंधीत गटविकास अधिकाºयाना ग्रामसेवक संघटनांनी एक पत्रही दिले आहे. ग्रामसेवकांच्या या निर्णयामुळे कृषी विभाग अडचणीत सापडला असून, यावर काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पीक कापणी प्रयोगाचे आवश्यक ते तांत्रिक ज्ञान व प्रशिक्षण ग्रामसेवकांना दिले जात नाही. त्याचबरोबर ग्रामसेवकांवर इतर विकास कामांचा ताणही जादा असतो. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी यंदाच्या खरीप हंगामाच्या पीक कापणी प्रयोगाचे काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.- व्ही. आर. चव्हाण,जिल्हाध्यक्ष, ग्रामसेवक युनियन, डी.एन.ई. बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीRevenue Departmentमहसूल विभाग