शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

बुलडाणा जि.प.च्या ३६७ शाळांच्या पटसंख्येत झपाट्याने घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:50 IST

बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या ३६७ शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी होत असून, दोन वर्षात या शाळांमधील तब्बल आठ हजार ३५९ विद्यार्थी कमी झाल्याने या शाळांची पटसंख्या रोडावली आहे. दरम्यान, हे विद्यार्थी खासगी शाळेत स्थलांतरीत झाल्याचा कयास आहे.

ठळक मुद्देदोन वर्षात आठ हजार विद्यार्थ्यांचे स्थलांतर अहवालात आली माहिती समोर

नीलेश जोशी । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्हा परिषदेच्या ३६७ शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी होत असून, दोन वर्षात या शाळांमधील तब्बल आठ हजार ३५९ विद्यार्थी कमी झाल्याने या शाळांची पटसंख्या रोडावली आहे. दरम्यान, हे विद्यार्थी खासगी शाळेत स्थलांतरीत झाल्याचा कयास आहे.कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी बुलडाण्यात ७ एप्रिल रोजी आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्या कमी होण्यासंदर्भातील अहवालावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी ही बाब स्पष्ट झाली.प्रामुख्याने जिल्ह्यातील १४४९ शाळांपैकी या ३६७ शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी झाल्याचे चित्र जिल्हय़ात आहे. २0१५-१६, २0१६-१७ आणि २0१७-१८ या शैक्षणिक वर्षातील या शाळांच्या पटसंख्येचा विचार करता ही बाब स्पष्ट होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात २0 पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या ही जवळपास २६४ आहे. शून्य ते दहा पटसंख्येच्या जिल्ह्यात ९ शाळा आहेत. यासंदर्भात शिक्षण विभागाने केलेल्या पाहणीत उपरोक्त ३६७ शाळांची पटसंख्या कमी झाल्याचे समोर आले आहे. २0१५-१६ मध्ये या शाळांमध्ये ५२ हजार ६७0 विद्यार्थी शिकत होते तर २0१६-१७ मध्ये या शाळांमधील चार हजार २१७ विद्यार्थी खासगी शाळांमध्ये स्थलांतरीत होऊन या शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या ही ४८ हजार ४५३ इतकीच राहिली. दरम्यान, २0१७-१८ या शैक्षणिक वर्षात पुन्हा या विद्यार्थी संख्येतून चार हजार १४२ विद्यार्थी अन्य शाळांमध्ये स्थलांतरीत झाल्याने या ३६७ शाळांमध्ये ४४ हजार ३११ विद्यार्थी संख्या उरली आहे.   यासंदर्भात जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझडे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

जिल्हा परिषदेच्या शाळा मात्र डिजिटलएकीकडे तीन वर्षात जिल्हा परिषदेच्या कमी पटसंख्येच्या शाळांमधून आठ हजार विद्यार्थी शिक्षणासाठी अन्यत्र स्थलांतरीत झाले आहे तर  दुसरीकडे जिल्ह्यातील ९0६ शाळा या डिजिटल झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये सेमी इंग्रजीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. ई-लर्निंगची सुविधा जिल्हा परिषद शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्याने ग्राम पातळीवरील विद्यार्थ्यांचा ओढा जिल्हा परिषद शाळेकडे वाढत असल्याचा दावा शिक्षण विभागातील सूत्रांशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी केला.

पटसंख्या टिकविण्यासाठी प्रयत्नजिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकविण्यासाठी प्रशासनाने सुधारणांची मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच भाग हा उपरोक्त डिजिटल शाळा, सेमी इंग्रजी अभ्यासक्रम सुरू करणे, ई-लर्निंग सुविधा पुरविणे आहे. त्यामध्ये जिल्हा प्रशासन बर्‍यापैकी यशस्वी झाले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळाz.p. buldhanaजिल्हा परिषद, बुलडाणा