शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विभागाचे पाणी वापर संस्थांकडे ३६ लाख थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 16:01 IST

Buldhana News ७ लाख ५० हजार रुपये अशी एकूण ३६ लाख ५० हजार रुपयांची थकबाकी आहे.

ठळक मुद्देपेनटाकळी प्रकल्पावर ३८ पाणीवापर संस्था कार्यरत आहेत.सहा कोल्हापूरी बंधाऱ्याच्या माध्यमातून ४० किलोमीटर पर्यंत पाणी नेले जाते. १४ हजार २३२ हेक्टर क्षेत्रावर सिंचन केले जाते.

- ओमप्रकाश देवकरलोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : जिल्ह्यात  मोठा प्रकल्प म्हणून पेनटाकळी प्रकल्पाची ओळख आहे.  या पेनटाकळी प्रकल्पावर ३८ पाणीवापर संस्था कार्यरत आहेत. या संस्थेकडे महासंघाची पाणी कर ३६ लाख रुपये थकबाकी आहे. रब्बी हंगामाकरिता पाणी आरक्षणासाठी एकही अर्ज पाणी वापर संस्थेकडे आलेला नाही. पेनटाकळी प्रकल्प १०० टक्के भरला आहे.  या प्रकल्पाची ५९ दलघमी एवढी क्षमता आहे. या प्रकल्पावर ३८ किलोमीटरचा एक कालवा असून कोल्हापुरी बंधारे सहा आहेत. या सहा कोल्हापूरी बंधाऱ्याच्या माध्यमातून ४० किलोमीटर पर्यंत पाणी नेले जाते. कालवा, उपकालवा, वितरिका, लघु वितरिका यांच्या माध्यमातून ६९ किलोमीटर पर्यंत पाणी नेले जाते. तर १४ हजार २३२ हेक्टर क्षेत्रावर सिंचन केले जाते. या प्रकल्पावर एकूण ३८ पाणीवापर संस्था कार्यरत असून, या संस्थेमार्फत शेतकरी  शेती सिंचनासाठी पाण्याचा वापर करतात. त्यांच्याकडे  ३६ लाख ५० हजार पाणी कर थकबाकी आहे. कालव्यावर २१० शेतकरी हे पाण्याचा लाभ घेतात. त्यांच्याकडे १९ लाख रुपये, कोल्हापुरी बंधाऱ्यावर ३२५ शेतकरी लाभ घेत असून १७ लाख ५० हजार रुपये अशी एकूण ३६ लाख ५० हजार रुपयांची थकबाकी आहे. यासोबतच रब्बी हंगामासाठी पाणी आरक्षण करण्याकरीता शेतकऱ्यांनी तात्काळ संस्थेकडे अर्ज सादर करण्यात यावा, असे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे. 

 शेतकऱ्यांनी पाण्यासाठी फोनवर मागणी न करता प्रत्यक्ष त्यांच्याकडे असलेली थकीत पाणी कर भरून अग्रिम रकमेसह संबंधित संस्थेकडे अर्ज तात्काळ सादर करावा. जेणेकरून रब्बी हंगामाकरिता पाण्याचे नियोजन करणे सोयीचे जाईल. - राजेंद्र गाडेकर, अध्यक्ष, पेनटाकळी प्रकल्प पाणी वापर संस्था महासंघ. 

पेनटाकळी प्रकल्पातून कालवा व कोल्हापूरी बंधाऱ्याच्या साह्याने जे शेतकरी सिंचन करतात त्यांच्याकडे पाणी कर बाकी आहे. त्या सर्व शेतकऱ्यांना थकबाकी न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्याच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. - एस. बी. चौगुले, उपविभागीय अभियंता, पेनटाकळी प्रकल्प.

टॅग्स :MehkarमेहकरIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पbuldhanaबुलडाणा