बुलडाणा : राज्य उत्पादन शुल्क विभाग, बुलडाणाच्या अधिकार्यांनी चिखली तालुक्यात दोन ठिकाणी छापे टाकून ३४ हजार ३७५ रुपयाची गावठी दारू पकडली. २९ जून रोजी पथकाने चिखली येथील गवळीपुरा भागात छापा टाकला असता चार महिला हातभट्टीची दारू गाळतांना आढळून आले. पथकाने त्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून मोहा सडवा रासायण, गावठी दारू असा एकूण १0४५0 रुपयाचा माल जप्त करण्यात आला. तर तालुक्यातील कोलारा शिवारात कोराडी नदीच्या काठी छापा टाकून १५ लिटर क्षमतेचे ७३ पिपे जवळपास १0९५ लिटर मोहा सडवा किंमत २३९२५ रुपयाचे साहीत्य बेवारस स्थितीत आढळून आले. या दोन्ही छाप्यामध्ये एकूण ३४३७५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
३४ हजाराची गावठी दारू जप्त
By admin | Updated: June 30, 2014 02:10 IST