शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

बुलडाणा जिल्ह्यातील ३२ हजार विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:37 IST

२०१७-१८ या शैक्षणिक वर्षात  प्रवेश घेतलेल्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कम लवकरच विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील मागास प्रवर्गातील ३२ हजार विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.  

ठळक मुद्देमागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश प्रलंबित रक्कम लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यात

ब्रम्हानंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील  महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांमधील मागास प्रवर्गातील एकूण ५२ हजार विद्यार्थ्यांपैकी २० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली होती, तर इतर विद्यार्थी अद्यापपर्यंत शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत होते. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात  प्रवेश घेतलेल्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कम लवकरच विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे आता बुलडाणा जिल्ह्यातील मागास प्रवर्गातील ३२ हजार विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.     विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना आर्थिक हातभार लावण्यासाठी सामाजिक न्याय विभाग अंतर्गत शिष्यवृत्तीच्या विविध योजना राबविण्यात येतात. विविध महाविद्यालये शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरित केल्या जाते. सामाजिक न्याय विभागांतर्गत देण्यात येणाºया या शिष्यवृत्तीचे जिल्ह्यात मागास प्रवर्गातील  ५२ हजार लाभार्थी विद्यार्थी आहेत. त्यापैकी आतापर्यंत २० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली असून, ३२ हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. दरम्यान, सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कम वितरित करण्यास ३ मे रोजी मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास ३२ हजार विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्तीची रक्कम लवकरच वितरित केल्या जाणार आहे. या रक्कमेतील निर्वाह भत्त्याची रक्कम पात्र विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. मागासप्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिक्षण व परीक्षा शुल्काची रक्कम प्राप्त होऊ न शकलेल्या महाविद्यालय शैक्षणिक संस्थांना केवळ २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी काही अटी व शर्तींवर प्रलंबित रक्कम देण्यात येणार आहे. पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांपैकी आजअखेर लाभ देण्यात आलेले विद्यार्थी वगळून उर्वरित विद्यार्थ्यांच्या पात्र अभ्यासक्रमांसाठी मिळणारी रक्कम ४ आठवड्यात दिली जाईल.

परीक्षा शुल्काची रक्कम मिळणार आॅफलाइन!शिष्यवृत्तीची रक्कम वितरित करण्याची सर्व प्रक्रिया सध्या आॅनलाइन झालेली आहे. पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम टाकल्या जाते. त्यानुसार सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कमही विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात टाकण्यात येणार आहे; मात्र यातील शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची रक्कम आॅफलाइन दिल्या जाणार आहे. त्यासाठी संबंधित महाविद्यालय आथवा शैक्षणिक संस्थेला आॅफलाइन पद्धतीने वितरित केली जाणार आहे. 

२०१७-१८ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या मागास प्रवर्गातील जवळपास २० हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वितरित करण्यात आलेली आहे. आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती लवकरच त्यांना देण्यात  येईल. - मनोज मेरटजिल्हा समाज कल्याण अधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाStudentविद्यार्थी