शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील ३१० कुपोषित बालकांना कोरोनाचा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 11:02 IST

जिल्ह्यातील ३१० अतितीव्र कुपोषित बालकांना सध्या कोरोनाचा धोका अधिक आहे.

- ब्रम्हानंद जाधव बुलडाणा : आपली रोग प्रतिकारक्षमता चांगली असेल, तर कोरोनाच नव्हे; कोणत्याही साथीच्या आजाराची भीती आपल्याला राहत नाही. रोग प्रतिकार क्षमता कमी असल्याने जिल्ह्यातील ३१० अतितीव्र कुपोषित बालकांना सध्या कोरोनाचा धोका अधिक आहे. संसर्गजन्य आजाराच्या काळात कुपोषित बालकांची विशेष काळजी घेण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.कोरोना विषाणुमुळे सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण १७ मिळून आलेले आहेत. प्रतिकारशक्ती चांगली असेल, तर कोरोनाच्या विषाणूने विशेष फरक पडत नसल्याचे कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून वैद्यकीय सुत्रांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. कोरोनापासून बचाव होण्यासाठी रोग प्रतिकारक्षमता वाढविण्याचा सल्लाही डॉक्टरांकडून दिल्या जात आहे. रोग प्रतिकार क्षमता कमी असलेल्यांमध्ये वयोवृद्ध, लहान मुलांचा समावेश असला तरी, कुपोषित बालकांमध्ये प्रतिकार क्षमतेची समस्या अधिक असते. जिल्ह्यात अतितीव्र कुपोषित (सॅम) बालकांची संख्या ३१९ आहे. मागील वर्षीपेक्षा यामध्ये १४२ ने वाढ झाली आहे. कुठलाही साथीचा आजार आल्यास कुपोषित बालकांना प्रतिकार क्षमता कमी असल्याने ते आजार बळावण्याची शक्यता अधिक असते. कुपोषित बालकांच्या शरीरामध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव होण्याची भीती जास्त आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यास, तो प्रतिकारशक्तीवर हल्ला करतो. त्यामुळे कुपोषित बालकांना कोरानापासून दूर ठेवण्यासाठी त्यांची विशेष काळजी घेण्याच्या सुचना जिल्हा परिषदच्या महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाकडूनही त्यांची विशेष तपासणी करणे गरजेचे आहे.पोषण आहाराचे धान्य घरपोचकुपोषित बालकांसाठी येणारे पोषण आहाराचे तांदूळ, डाळी, तेल यासह विविध प्रकारचे धान्य बालकांना घरपोच देण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्याचे धान्यही घरपोच दिले आहे. पुढील दोन महिन्याचे धान्य लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

कुपोषित बालकांमध्ये कुठलाही आजार लवकर बळावतो. कोरोनापासून बालकांची विशेष काळजी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यांचा पोषण आहारही वितरीत करण्यात आला आहे. मुलांना बाहेर खेळ देऊ नये, कुटूंबाच्या बाहेरील व्यक्तींशी त्यांचा संपर्क येणार नाही, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.- अरविंद रामरामे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी,महिला व बाल विकास विभाग, जि. प. बुलडाणा.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस