बुलडाणा : राज्य उत्पादन शुल्क विभागच्या पथकाने येथील परदेशीपुरा व आठवडी बाजारात छापा मारून ३0 हजार ६९२ रुपयांची गावठी दारू व साहित्य जप्त केले. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी अधीक्षक व्ही.एम. पाटील व एन.के. मावळे यांच्या पथकाने गुरुवारी छापा मारला असता, मनोज सुकलाल परदेशी आणि उमेश मनोज परदेशी यांच्या ताब्यातून १३ लिटर हातभट्टीची दारू, सडवा, तीन इलेक्ट्रिक गीझर, चार ड्रम व इतर मुद्देमाल असा २९१00 रुपयांचा माल जप्त केला. भिमनगर येथील सतीश अशोक लोखंडे याच्याजवळून एकूण ३0 हजार ६९२ रुपयांचा माल जप्त करून तिन्ही आरोपीस अटक करण्यात आली.
३0 हजारांची गावठी दारू जप्त
By admin | Updated: July 24, 2015 00:43 IST