शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

३0 टक्के शेतकरी विम्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2016 02:14 IST

सिंदखेडराजा तालुक्यातील शेतक-यांना कोरड्या दुष्काळाची मदत अद्याप नाहीच.

अशोक इंगळे सिंदखेडराजा (जि.बुलडाणा), दि. ५ : तालुक्यातील हजारो शेतकरी कोरड्या दुष्काळाच्या मदतीपासून वंचित असून, त्यांना अद्याप मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. पीक विम्याची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाली असून, ती कर्ज खात्यात वळती करण्याचा सपाटा बँकांनी लावला आहे. तो त्वरित थांबवून विम्याची रक्कम शेतकर्‍यांना द्यावी आणि जे ३0 टक्के शेतकरी पीकविम्यापासून वंचित आहेत. त्यांच्या खात्यात पीक विमा रक्कम जमा करावी, जेणेकरून त्यांना दिलासा मिळेल, अशी ही मदत तत्काळ मिळावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. तालुक्यात मागील वर्षी कोरडा दुष्काळ पडला होता. या दुष्काळाची दाहकता एवढी होती की, खरिपाची सर्वच पिके सुकली होती. पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाले होते. पेरलेलं उगवलंच नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला होता. बँकेचे कर्ज डोक्यावर वाढल्याने काही शेतकर्‍यांनी आत्महत्यासुद्धा केल्या होत्या. सतत तीन वर्षे दुष्काळाची भीषण दाहकता अनुभवली होती. जवळजवळ सोयाबीन, कपाशी, ज्वारी, मूग, उडीद ही पिके न आल्याने पिकाची आणेवारी २२ पैसे आली. महाराष्ट्र शासनाने तालुका कोरडा दुष्काळात टाकला आणि हेक्टरी ६ हजार मदत जाहीर केली होती. ती मदत मार्च महिन्यात तहसील कार्यालयात आली. काही गावात मदत मिळाली; परंतु काही गावात ती मदत पोहोचली नाही. महसूल विभागाच्या तांत्रिक चुकांमुळे मदत परत गेल्याचे बोलल्या जाते. जे शेतकरी मदतीपासून वंचित राहिले त्यांना मदत मिळावी म्हणून आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांनी विधानसभेत प्रश्न मांडला होता. त्यानंतरही अनेकांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी केली होती.