देऊळगाव राजा: शहरातील साळीवाडा परिसरातल एकनाथ धुळे यांच्या घरचे कुलूप तोडून घरातील सोन्य-चांदीच्या दागिन्यासह ३0 हजार नगदी असा एकूण ३ लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. एकनाथ धुळे २ जूनच्या रात्री घराच्या बरच्या मजल्यावर झोपले असताना खालच्या रूमचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. तसेच घरातील सोन्याचे दोन मंगळसुत्र, दोन अंगठय़ा, १ बांगडी जोड, कानातील दागिने यासह रोख ३0 हजार रूपये असा एकूण ३ लाखाचा माल लंपास केला.
घराचे कुलूप तोडून ३ लाखाची चोरी
By admin | Updated: June 4, 2014 23:52 IST