शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आठवडाभरात २६ टँकरला  मिळाला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 18:19 IST

बुलडाणा: जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली असून टंचाई निवारणार्थ उपाययोजनांसाठी प्रशासनाची चांगलीच कसरत होत आहे. गेल्या आठवडाभरामध्ये जिल्ह्यात २६ टँकरला मान्यता देण्यात आली आहे;

बुलडाणा: जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली असून टंचाई निवारणार्थ उपाययोजनांसाठी प्रशासनाची चांगलीच कसरत होत आहे. गेल्या आठवडाभरामध्ये जिल्ह्यात २६ टँकरला मान्यता देण्यात आली आहे; तरीसुद्धा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये टँकरची प्रतीक्षा कायम आहे. गतवर्षी पर्जन्यमान सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी झाल्याने हिवाळ्यापासून जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा बसायला सुरूवात झाली होती. सध्या जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढली असून त्यासाठी टँकर सुरू करणे, विहिर अधिग्रहण करणे याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी अधिकारी व कर्मचाºयांची चांगलीच धांदल उडत आहे. दरम्यान, ९ एप्रिल रोजी  जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील ११ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणार्थ पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याध्ये     खामगाव राजा तालुक्यातील पारखेड, आवार, लोणी गुरव, शेलोडी, खुटपुरी, बोरजवळा याठिकाणी टँकर सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. तर नांदुरा  तालुक्यातील  जवळा बाजार, शेगांव तालुक्यातील लासुर खु., लासुरा बु., सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी खुर्द,  दरेगांव येथे टँकरला मान्यता देण्यात आली आहे. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या आठवडाभरामध्ये २६ टँकर   टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश उपविभागीय अधिकारी (महसूल) यांनी दिले आहे. 

 विहिर अधिग्रहणावरही भर जिल्ह्यातील काही तालुक्यात सद्यस्थितीत पिण्याच्या स्त्रोतापासुन आवश्यक पाणी दरडोई दरदिवशी २० लिटर्स उपलब्ध होत नाही. त्यामुळे पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना म्हणुन टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मागील आठवड्यात नांदुरा तालुक्यातील सात, मलकापूर  व मोताळा तालुक्यातील गावांमध्ये टँकर सुरू करण्यात आले. तर विहिर अधिग्रहणावरही भर देण्यात येत आहे. 

टँकर सुरू करण्यासाठी पशुधनाचाही विचारटंचाईग्रस्त असलेल्या कुठल्याही गावात टँकर सुरू करण्यापूर्वी त्या गावची लोकसंख्या विचारात घेतली जाते. त्याचबरोबर गावातील पशुधनाचीही संख्या पाहून त्याठिकाणी किती लिटर्स पाणी पाठवायचे याला मान्यता दिली जात आहे. अडीच हजार लोकसंख्या  व एक हजार पर्यंत पशुधन असलेल्या गावांसाठी ६५ ते ७० हजार लिटर्स टँकरद्वारे पाणीपुरवठा मंजूर करण्यात येत आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई