शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील २५ हजार शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या लाभापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 11:22 IST

loan waiver benefits आधार प्रमाणीकरण रखडले असल्याने त्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळू शकला नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफी योजनेपासून बुलडाणा जिल्ह्यातील २५ हजार शेतकरी अद्यापही वंचित असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी ५,३०० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण रखडले असल्याने त्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळू शकला नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. पुढील महिन्यापासून खरीप पीककर्जाचे वाटप शेतकऱ्यांना होणार आहे. गेल्या वर्षी कोरोनाचे संकट असतानाही शेतकरी कर्जमाफीमुळे अनेक बँकांनी शेतकऱ्यांना सढळ हाताने पीककर्ज वाटप केले होते. त्यामुळे गेल्या तीन वर्षांतील महत्तम, असे ५४ टक्के पीककर्ज वाटप केले गेले होते. त्यामुळे आगामी खरीप हंगामामध्ये किती शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध होते, याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. महाविकास आघाडी सरकारने दोन लाख रुपये मर्यादेत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ६९ हजार ५९६ शेतकऱ्यांना  १ हजार १२१ कोटी ४० लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील २५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकलेला नाही. जवळपास ५,३०० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण रखडले आहे. त्यामुळे ते मार्गी लावण्याची आता गरज निर्माण झाली आहे. यासोबतच १९ हजार ७०० शेतकऱ्यांचे विशिष्ट क्रमांकच न आल्यामुळे त्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही.एकीकडे शेतकऱ्यांना गरजेनुरूप पीककर्ज वाटप करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, गतवर्षीच्या कर्जमाफी योजनेचा लाभच जिल्ह्यात २५ हजार शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे येत्या हंगामात ते प्रसंगी पीककर्जापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी