शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

बुलडाणा जिल्ह्यात नायब तहसीलदारांची २४ पदे रिक्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 16:22 IST

Buldana district News बुलडाणा जिल्ह्यात सद्यस्थितीमध्ये नायब तहसीलदारांची २४ पदे रिक्त आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गातील पदोन्नती करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात तथा महसूल विभागाचे आयुक्त यांचे कडे १८ नोव्हेंबर रोजी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.                  बुलडाणा जिल्ह्यात सद्यस्थितीमध्ये नायब तहसीलदारांची २४ पदे रिक्त आहेत. सदर रिक्त पदांमुळे यावर्षी उद्भवलेल्या कोवीड आजाराची परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती, निवडणूक, व दैनंदिन कामकाज करताना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. त्याचा मोठा ताण महसूल प्रशासनावर पडत आहे. असे असतांना अमरावती विभागीय पदोन्नती समितीने अद्याप पर्यंत अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गातील पदोन्नतीचा प्रस्ताव शासनास मान्यतेकरीता पाठवलेला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अमरावती विभागातील अधिकारी हे पुढील पदोन्नतीमध्ये सेवा जेष्ठता असून सुद्धा ज्येष्ठतेत मागे पडत असून त्यांचा दूरगामी परिणाम पदांच्या कर्मचारी यांच्या पदोन्नतीमध्ये होत आहे. यास बुलडाणा जिल्ह्यातील कर्मचारी मोठ्या प्रमाणावर बाधित ठरलेले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण होत आहे. तरी अमरावती विभागातील नायब तहसीलदार संवर्गातील पदोन्नतीच्या मार्गातील अडचणी दूर करून नायब तहसीलदार संवर्गातील पदोन्नती करण्याबाबत संबंधितांना योग्य ते निर्देश देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्याचे  उपाध्यक्ष अजय पिंपरकर, जिल्हा अध्यक्ष संजय टेभीकर, जिल्हा सरचिटणीस किशोर हटकर, व बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय अध्यक्ष नंदकुमार येसकर आदींनी केली आहे.

टॅग्स :Malkapurमलकापूरbuldhanaबुलडाणा