शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २२  हजार ग्रामसेवक आंदोलनाच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 15:33 IST

राज्य भरातील 22 हजार ग्रामसेवक शासनाच्या विरोधात रस्तावर उतरुन आंदोलन करणार अशी माहीती राज्यसरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी लोकमतला दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : शासनाच्या योजनांची ग्रामीण भागात प्रभावी अंमलबजावणी करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार गांभीर्य दाखवत नसल्याने या संवर्गात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. विविध मागण्यांबाबत वेळोवेळी झालेल्या चर्चा, बैठकात देण्यात आलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता झालेली नाही. त्यामुळे याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा राज्यातील 22 हजार ग्रामसेवक शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही मार्गाने विविध प्रकारचे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी दिली.याबाबत राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांना युनियनच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे व राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी म्हटले आहे की, राज्यातील 22 हजार ग्रामसेवकांमध्ये सध्या अस्वस्थता निर्माण झाली आहे. शासनाकडून मिळालेल्या आश्वासनांनुसार प्रत्यक्षात कार्यवाही करण्याचे आदेश जारी करण्यात यावेत. ग्रामसेवक संवर्गास दरमहा 3 हजार रुपये प्रवास भत्ता मंजूर करण्यात यावा, ग्रामसेवकांची शैक्षणिक अर्हता बदल करण्यात येवून यापुढे कोणत्याही शाखा पदवीधर ग्रामसेवक भरतीत समाविष्ट करावा, सन 2011 च्या लोकसंख्येचा आधार घेवून राज्यभर ग्रामविकास अधिकारी सजे व पदे वाढवावीत, ग्रामसेवक पद रद्द करून यापुढे फक्त ग्रामविकास अधिकारी अथवा पंचायत विकास अधिकारी या पदाची निर्मिती करावी, ग्रामसेवकांवरील कामांचा ताण लक्षात घेवून अतिरिक्त कामाचा बोजा लादू नये, महसूल, वन, कृषी, नरेगा आदी विभागांची कामे करताना सक्ती, कारवाई केली जाते. हे प्रकार तातडीने थांबविण्यात यावेत. ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी यांना सातवा वेतन आयोग लागू करताना अनेक त्रुटी ठेवण्यात आल्या आहेत. या वेतनत्रुटीत तातडीने सुधारणा करावी, राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई 136 संघटनेने राज्यातील सर्व ग्रामसेवकांचे महाअधिवेशन शिर्डीत आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. या महाअधिवेशनासाठी मंत्री महोदयांनी तारीख देवून अधिवेशनात ग्रामसेवकांना मार्गदर्शन करावे तसेच प्रश्न सोडविण्याबाबत कार्यवाही करावी अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.वरील मागण्याची पुर्तता न झाल्यास राज्य भरातील 22 हजार ग्रामसेवक शासनाच्या विरोधात रस्तावर उतरुन आंदोलन करणार अशी माहीती राज्यसरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :khamgaonखामगावagitationआंदोलन