लाखनवाडा : लाखनवाडा परिसरातील गावांना पाणीपुरवठा करण्याकरीता मन प्रकल्पावरून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र योग्य नियोजनाअभावी या योजनेव्दारे होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. परिसरातील २१ गावांसाठी असलेल्या या पाणीपुरवठा योजनेवरुन पाणी वाटप व देखभाल दुरूस्तीचा कंत्राट देण्यात आलेला आहे. परंतु सदर कंत्राटदार यांचे पाणी सोडण्यावर नियंत्रण नाही त्यामुळे नागरीक पाणी पुरवठय़ामुळे त्रस्त आहेत. अनेकवेळा मोटारपंप नादूरूस्त किंवा जलवाहिनीमुळे बंद पडते. अशावेळेस धिम्मगतीने दुरूस्तीचे काम सुरू असते. परिणामी नागरीकांना चार/पाच दिवस पाणी मिळत नाही. वास्तविक पाणी समस्या महत्वाची बाब असल्यामुळे याला प्र थम प्राधान्य देवून युध्द पातळीवर दुरूस्तीचे काम करून शक्य तितक्या लवकर पाणी पुरवठा पुर्ववत सुरू करायला पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाही. एवढय़ा वेळेस जलवाहिनी फुटली तर फक्त कपलींग नाही हे कारण देवून आणि ते अकोल्याशिवाय मिळत नाही, असे सांगुन पाणी पुरवठा बंद ठेवून नागरीकांना वेठीस धरण्यात येते. तसेच लाखनवाडा या गावाला दररोज चार लाख लिटर पाणी पुरवठा करण्यात येईल, असा करार झालेला आहे. परंतु या गावाला प्रत्यक्ष ितसर्या दिवशी जास्तीत जास्त एक ते तीन लाख लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो म्हणजेच या गावाला दररोज १ लाख २५ हजार ते १ लाख ५0 हजार लिटर पाणी मिळते. आणि हे पाणी करारनाम्याप्रमाणे दररोज २ लाख ५0 हजार लिटर कमी मिळत आहे. गावाची लोकसंख्या विचारात घेता दररोज १ लाख ५0 हजार लिटर पाणी खुप कमी पडते, त्यामुळे नाईलाजास्तव ग्रामपंचायतला स्वताचे दोन मोटारपंप नियमीत चालु ठेवावे लागतात. तरी सुध्दा येथील नागरीकांना मुबलक पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरीक पाण्यावाचून त्रस्त आहेत.तेव्हा कंत्राटदाराला समज देवून पाणी पुरवठा सुरळीत करण्याची आवश्यकता आहे.
२१ गाव पाणीपुरवठा योजना विस्कळीत
By admin | Updated: June 27, 2014 00:28 IST