शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

भानखेडमध्ये २०० देशी कोंबड्यांचा अकस्मात मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 21:19 IST

Buldhana District News जनार्दन इंगळे यांच्या सुमारे २०० देशी कोंबड्या अचानकपणे मृत्युमुखी पडल्या आहेत.

चिखली : येथून जवळच असलेल्या भानखेड शिवारात जनार्दन इंगळे यांच्या सुमारे २०० देशी कोंबड्या अचानकपणे मृत्युमुखी पडल्या आहेत. प्रामुख्याने मराठवाड्यात बर्ड फ्लूमुळे कोंबड्या दगावत असल्याने चिंतेत असलेल्या पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये या घटनेने धास्ती पसरली आहे.भानखेड येथील शेतकरी जनार्दन इंगळे यांनी आपल्या शेतात सुमारे २०० देशी कोंबड्यांचे पालन चालविले होते. २३ जानेवारी सकाळी या कोंबड्या अचानकपणे मृत्युमुखी पडल्या आहेत. यासह याच गावांतील इतरही नागरिकांची एक -दोन याप्रमाणेदेखील कोंबड्या दगावल्या आहेत. दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच चिखली तालुका पशुधन अधिकारी डॉ. दांडगे, पशुवैद्यकीय लघु चिकित्सालयाचे डॉ. युवराज रगतवान, पशुधन पर्यवेक्षक डॉ. प्रवीण निळे, व डॉ. पूनम तायडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. दरम्यान, या कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा शोध घेण्यासाठी काही कोंबड्यांचे सॅम्पल अकोला येथे तपासणीसाठी पाठविले आहेत. तर उर्वरित कोंबड्यांची जमिनीत खड्डा खोदून योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावण्यात आली आहे. डॉ. युवराज रगतवान यांनी पोल्ट्री फार्म व्यावसायिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. यावेळी गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक व गावकरी उपस्थित होते.

मृत्यूमुखी पडलेल्या कोंबड्यांपैकी तीन कोंबड्यांचे नमुने अकोला येथे तपासणीसाठी पाठविले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावरच नेमके कारण समजू शकेल. तत्पूर्वी खबरदारीच्या उपाययोजनेबाबत पोल्ट्री व्यावसायिकांना कळविण्यात येत आहे. पक्षीपालकांनी कोंबड्यांचा मृत्यू झाल्यास जवळच्या पशुवैद्यकीय रूग्णालयात कळवावे.- डॉ. शशिकांत दांडगे, पशुधन विकास अधिकारी, विस्तार अधिकारी

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लूChikhliचिखलीbuldhanaबुलडाणा