शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Women's Day Special : २० वर्षात चंद्रप्रभा यांनी गाजविले तीन हजारांवर शंकरपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 11:37 IST

Women's Day Special द्रप्रभा पाटील यांनी १९९० साली पहिल्यांदा शंकरपटात भाग घेतला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क   खामगाव : पुरूषांचीच मक्तेदारी असलेल्या शंकरपटात भाग घेऊन पुरूषांपेक्षा स्त्रीयाही कमी नाही हे सिद्ध चंद्रप्रभा पाटील यांनी सिद्ध केले आहे. आतापर्यंत त्यांनी तीन हजार शंकरपटात भाग घेतला आहे.नांदुरा तालुक्यातील ज्ञानगंगापूर या गावाच्या रहिवासी असलेल्या चंद्रप्रभा पाटील यांनी डीएचएमएसचे शिक्षण पुर्ण केले. वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेतल्यावर त्यांनी नोकरी किंवा रूग्णालय सुरू न करता वेगळी वाट धरली. शंकरपट या मैदानी खेळाचे पूर्वी ठिकठिकाणी आयोजन केल्या जात होते. हजारो नागरिक हा खेळ पाहण्यासाठी गर्दी करीत होते. शंकरपट म्हटले की पुरूषच असा सर्वांचा समज होता. शंकरपट खेळणे तर दुरच हा खेळ पाहायलाही महिला येत नव्हत्या. मात्र, अशातच चंद्रप्रभा पाटील यांनी पुरूषांची मक्तेदारी मोडीत काढीत महिलाही हा खेळू शकतात, हे संपूर्ण जगाला दाखवून दिले. महाराष्ट्रातील या एकमेव महिला धुरकरी असतील. चंद्रप्रभा पाटील यांनी १९९० साली पहिल्यांदा शंकरपटात भाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत तब्बल ३ हजार शंकरपटात भाग घेतला आहे. त्यांनी छत्तीसगड व मध्यप्रदेशातही शंकरपटात भाग घेतला आहे. शंकरपटात भाग घेण्याकरिता संपूर्ण देशातूनच त्यांना बोलावणे येते. त्यांनी याची प्रेरणा त्यांचे वडिल श्रीराम रूपचंद महाले पाटील यांच्याकडून घेतली. ते पोलिस पाटील होते. त्यांच्या घरी शेती आणि एक बैलाची जोडी होती. सीमाताई लहानपणापासून वडिलांना शेतीकामात हातभार लावत होत्या. मुक्या जनावरांचा त्यांना विशेष लळा होता. लहानपणापासूनच धाडसी वृत्ती त्यांच्यात होती. चंद्रप्रभा यांचे वडील दरवर्षी शंकरपटात भाग घ्यायचे. एकदा त्या वडिलांसोबत शंकरपटात गेल्या. बैलांना धरून उभ्या असलेल्या चंद्रप्रभा यांना काही पुरुषांनी 'हा मर्दानी खेळ असून, महिलांनी यापासून दूरच राहावे, असे टोमणे मारले. त्यानंतर त्यांनी हा खेळ खेळण्याचा निश्चय केला. त्यांनी शेतातच बैलांना पळविण्याचा सराव सुरू केला. गाई, म्हशी जनावरांशी त्यांना विशेष लळा आहे. त्यांच्या घरच्या एका गाईने जुळी वासरे दिली. त्यांची नावे 'जीवन-पवन' अशी ठेवली. त्यांची चांगली जोपासना केली. त्यानंतर त्यांनी शंकरपटात भाग घ्यायचे ठरविले. वयाच्या विसाव्या वर्षी मोताळा तालुक्यातील पिंपळगाव नाथ येथील शंकरपटात १९९३ मध्ये त्यांनी पहिल्यांदा शंकरपटात भाग घेतला. त्यावेळी त्यांना टीकाही सहन करावी लागली. मात्र, न घाबरता त्यांनी उत्कृष्टपणे बैल पळविले. तेव्हापासून तर कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू होईपर्यंत त्या शंकरपटात सहभागी होत आहे. एक महिला शंकरपट खेळते ही त्यावेळी सर्वांसाठीच आश्चर्याची बाब होती. मात्र, चंद्रप्रभा यांनी पुरूषांची मक्तेदारी मोडीत काढली. 

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनNanduraनांदूरा