शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
2
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
3
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
4
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
5
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
6
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
7
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
8
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
9
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
10
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
11
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
12
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
13
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
14
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
15
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
16
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
17
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
18
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
19
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
20
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?

४ काेटी तरुणांसाठी २ लाख काेटी रुपये; विकसित भारतासाठी काैशल्य वाढविणार; राेजगार निर्मितीवर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 07:32 IST

पहिल्या नाेकरीमध्ये सरकारचा ‘शगुन’, थेट खात्यात येणार पैसे

लाेकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशात माेठ्या प्रमाणावर राेजगारनिर्मितीसाठी सरकारने कंबर कसल्याचे अर्थसंकल्पातून दिसत आहे. राेजगार, काैशल्य आणि इतर संधींसाठी अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी २ लाख कोटी रुपयांची भरीव तरतूद जाहीर केली. या निधीतून विविध याेजना राबविण्यात येणार असून त्याचा ४.१ काेटी तरुणांना लाभ हाेणार आहे. 

विकसित भारतासाठी सरकारने तरुणांवर जास्त लक्ष्य केंद्रित केले आहे. सरकारच्या ९ प्राधान्यांपैकी राेजगारनिर्मिती आणि काैशल्य विकास हे एक आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची पाच पॅकेजेसची घाेषणा सीतारामन यांनी केली. पुढील ५ वर्षांमध्ये यासाठी निधी खर्च करण्यात येणार आहे. 

उत्पादन क्षेत्रात नाेकऱ्याही याेजनादेखील ईपीएफओशी जाेडण्यात येणार आहे. सरकारने उत्पादन क्षेत्रातील अतिरिक्त राेजगार निर्मितीसाठी सरकार प्राेत्साहन भत्ता देईल. पहिल्यांदाच नाेकरी मिळविणाऱ्या कर्मचाऱ्याचे तसेच कंपनीच्या पहिल्या चार वर्षांच्या याेगदानात सरकार हा भत्ता थेट जमा करेल. ३० लाख युवक आणि त्यांना नाेकऱ्या देणाऱ्या कंपन्यांना या याेजनेचा थेट फायदा हाेणार आहे.

महिलांचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्ननाेकऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण वाढण्यासाठी सरकार विविध उद्याेगांच्या मदतीने वर्किंग वूमन हाेस्टेल उभारण्यासाठी सरकार मदत करणार आहे. याशिवाय लहान मुले असलेल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या ठिकाणी पाळणाघरेही उभारण्यात येईल. याशिवाय महिला स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून महिलांसाठी विशेष काैशल्यविकास कार्यक्रम राबविण्यात येईल. त्यासाठी राज्य सरकारांचेही सहकार्य घेण्यात येईल.

१.४८ लाख काेटी रुपयांची तरतूद शिक्षण, राेजगार आणि काैशल्य विकासासाठी करण्यात आली आहे, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.

नाेकऱ्या देणाऱ्यांना मदतदरमहा १ लाख रुपयांपर्यंत पगाराच्या नाेकऱ्या या याेजनेसाठी गृहीत धरल्या आहेत. ज्यांनी अतिरिक्त नाेकऱ्यांची निर्मिती केली, त्या कंपन्यांना या याेजनेतून मदत करण्यात येणार आहे. सरकार दाेन वर्षांसाठी दरमहा ३ हजार रुपये ईपीएफओच्या याेगदानात थेट जमा करेल. 

राेजगाराशी संबंधित भत्तातरुणांसाठी सरकारने राेजगाराशी संबंधित भत्त्याची घाेषणा केली. हा भत्ता ‘ईपीएफओ’मधील नाेंदणीशी जाेडलेला आहे. त्यातून प्रथमच नाेकरीला लागलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख पटविण्यात येईल. असे कर्मचारी आणि कंपन्यांना या याेजनेतून मदत करण्यात येईल. 

युवा काैशल्य विकासयुवकांच्या काैशल्य विकासावर सरकारने भर दिला आहे. १ हजार ‘आयटीआय’च्या माध्यमातून पुढील ५ वर्षांमध्ये २० लाख तरुणांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. ७.५ लाख रुपयांचे कर्ज सरकारी निधीतून तरुणांना देण्यात येणार आहे. याचा फायदा २५ हजार विद्यार्थ्यांना हाेण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2024jobनोकरी