शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

१९,१४२ शेतकऱ्यांना मिळाला बियाणे अनुदानाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 12:23 IST

Agriculture Sector News : १९ हजार १४२ शेतकऱ्यांना बियाणांसाठी अनुदान देण्यात येणार आहे.   

- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत बियाण्यांवर अनुदान देण्यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. जिल्ह्यातील ६४ हजार १३७ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १९ हजार १४२ शेतकऱ्यांना बियाणांसाठी अनुदान देण्यात येणार आहे.   शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचे बियाणे वापरावे. यासाठी शासनामार्फत अनुदान दिले जाते. अनुदान देण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, ऑनलाइन अर्जांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अनेक लहान गावांमध्ये अर्ज करण्याची सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना अर्ज करण्याकरिता शहरात यावे लागते. त्यातच कोरोनामुळे सर्वत्र बंद असल्यामुळे अर्ज करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी आल्या. त्यामुळे ऑनलाइन अर्जांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. जिल्हाभरातून अनुदानासाठी ६४१३७ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते. बियाणांची एक बॅग २४०० रुपयांची आहे. यामध्ये शेतकऱ्यांना ३६० रुपये अनुदान देण्यात येते. कृषी विभागाकडे आलेल्या अर्जाची लॉटरी काढण्यात आली. त्यानुसार १९१४२ शेतकरी अनुदानास पात्र ठरले. जे शेतकरी अनुदानास पात्र ठरले, त्यांना एसएमएस प्राप्त झाला आहे. संबंधित शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून परमिट दिले जाईल.  दोन वर्षे परतीच्या पावसामुळे बियाण्यांची टंचाई निर्माण झाली आहे.

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरी