सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या जिल्ह्यात १६६२ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 11:24 AM2020-08-14T11:24:24+5:302020-08-14T11:24:39+5:30

सोयाबीन बियाणे उगवल्या नसल्याच्या १,६६२ शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या होत्या.

1662 complaints of non-germination of soybean seeds in the district | सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या जिल्ह्यात १६६२ तक्रारी

सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या जिल्ह्यात १६६२ तक्रारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात पेरणीच्या हंगामात सोयाबीन बियाणे उगवल्या नसल्याच्या १,६६२ शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ६५३ शेतकऱ्यांना संबंधित कंपनीकडून २८ लाख ३१ हजार ७३५ रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सुत्रांनी दिली.
जुन, जुलै महिन्यात प्रामुख्याने या समस्येला शेतकºयांना सामोरे जावे लागले होते. जिल्ह्यातील १३ ही तालुक्यात यासंदर्भात तक्रारी झाल्या होत्या. प्रकरणी यासंदर्भात बियाणे कंपन्यांच्या विरोधात तक्राहीही करण्यात आल्या होत्या तर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्त्वात जिल्ह्यातील शेतकºयांनी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांना घेरावही घातला होता. त्यामुळे ही प्रकरणे ऐरणीवर आली होती. तसेच औरंगाबाद येथील एका कंपनीविरोधात चिखलीमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
प्रकरणी कंपन्यांकडून शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यास प्रारंभ झाला होता. त्यानुषंगाने आतापर्यंत ६५३ शेतकºयांना २८ लाख ३१ हजार ७३५ रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. दरम्यान, उर्वरित शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने सध्या कृषी विभाग कार्यवाही करत आहे.

 

Web Title: 1662 complaints of non-germination of soybean seeds in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.