शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघात! बुलडाण्यात टिप्पर उलटून १६ मजूर गंभीर जखमी; ८ जणांचा मृत्यू झाल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 14:00 IST

सिंदखेड राजा-मेहकर मागार्वरील तडेगाव फाट्याजवळची घटना; सर्व मजूर मध्यप्रदेश, बिहारमधील 

दुसरबीड (जि. बुलडाणा): सिंदखेड राजा- मेहकर मार्गावर दुसरबीड गावानजीक तडेगाव फाट्याजवळ समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या मजुराला तडेगाव येथील कॅम्पमध्ये घेऊन जाणाऱ्या टिप्परला अपघात होऊन त्यात बसलले १६ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. यातील जवळपास ८ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान गंभीर जखमींना त्वरेने जालना येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हा अपघात २० ऑगस्ट रोजी दुपारी १२च्या सुमारास घडला.प्राथमिक माहितीनुसार दुसरबीड येथून लोखंडी गज घेऊन एक टिप्पर हे समुद्धी महामार्गच्या कामासाठी उभारण्यात आलेल्या तडेगाव येथील कॅम्पमध्ये जात होता. या टिप्परमध्ये समृद्धी महामार्गावर काम करणारे मजूरही बसलेले हाेते. तडेगाव नजीक अचानक टिप्पर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्डयात उलटला. त्यामध्ये असलेले मजूर गंभीर जखमी झाले असून यात जवळपास आठ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र त्यास किनगाव राजा पोलिस ठाण्याचे ठाणेदार सोमनाथ पवार यांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. अपघातातील गंभीर जखमींना त्वरित जालना येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. यातील तीन जखमींना सिंदखेड राजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.या अपघातातील मृतांचा नेमका आकडा किती ही बाब अद्याप स्पष्टपणे सांगता येणार नसल्याचे किनगाव राजाचे ठाणेदार सोमनाथ पवार म्हणाले. अपघातामधील गंभीर जखमी मजूर व मृतक हे मध्यप्रदेश आणि बिहारमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळातच किनगाव राजा पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना त्वरित जालना येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. अपघातानंतर तडेगाव नजीक बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे. सोबतच या मार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती.

टॅग्स :Accidentअपघात