खामगाव (जि. बुलडाणा): : कृषिउत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदार यादीतील आक्षेप आणि दावे निकाली काढताना त्या १५३ व्यापार्यांची नावे मतदार यादीतच राहणार असल्याने काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. खामगाव कृषिउत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया आता रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. आ. भाऊसाहेब फुंडकर व माजी आ. दिलीप सानंदा यांच्या अस्तित्वाची लढाई निर्माण झाली आहे. काँग्रेसच्या अधिपत्याखाली १0 वर्षापासून सत्ता असल्याने व्यापारी मतदार संघात आपलेच उमेदवार निवडून आणण्याची काँग्रेसची फिल्डिंग पणाला आली. १५३ व्यापार्यांची नावे कमी करण्यासाठी भाजपला अपयश आल्याने आता व्यापारी मतदारसंघातील दोन जागा काँग्रेसने आ पल्याकडे वळल्याचे बोलले जाते. भाजपचे श्रीधर राऊत यांनी थकबाकीदार ५४ सभासदांची मतदार यादीतील नावे कमी करण्यास घेतलेला आक्षेप फेटाळल्याने काँग्रेसलाच दिलासा मिळाला. तिसरी अपील काँग्रेसच्या सहा सदस्य गोंधनापूर ग्रामपंचायतमधील राजीनामा दिल्यानंतरही मतदानाचा अधिकार मागत होते, तो त्यांना मिळाला नाही. तूर्त १५३ व्या पर्यांची नावे मतदार यादीत कायम असल्यामुळे काँग्रेसला दिलासा मिळाला आहे.
१५३ व्यापार्यांची नावे मतदार यादीत कायम
By admin | Updated: April 16, 2015 00:42 IST