शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जामोद तालुक्यातील १५०० शेतकरी राबविणार 'स्मार्ट कॉटन'चा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 18:43 IST

Agriculture News : जळगाव तालुक्‍यातील १३ गावांमधील १५०० शेतकरी "एक समूह एक वाण"चा प्रयोग राबविणार

- नानासाहेब कांडलकजळगाव जामोद : महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यात यावर्षी कापूस मूल्य साखळी विकास उपप्रकल्प (स्मार्ट कॉटन) राबविल्या जात आहे.त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा समावेश असून जिल्ह्यातील जळगाव जामोद व देऊळगाव राजा या दोन तालुक्यांचा समावेश यात करण्यात आला आहे.जळगाव तालुक्यातील 13 गावांमधील 1500 शेतकरी तीन हजार एकर शेतीवर स्मार्ट कॉटनचा प्रयोग राबविणार आहे.                  राज्यातील कापूस मूल्य साखळी ही जागतिक मूल्य साखळीशी स्पर्धाक्षम नाही.कारण राज्यातील कापूस एकजिनसी व स्वच्छ नसल्याने कापसाची प्रत घसरते.त्यामुळे कापसाला अपेक्षित भाव मिळत नाही तसेच कापसाच्या मूल्य साखळीत प्रक्रियेनंतर रुई आधारित बाजार व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग नसल्याने एकजिनसी व स्वच्छ कापूस उत्पादन केले तरी शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होत नसल्याने शेतकरी या बाबीकडे लक्ष देत नाही.यावर पर्याय म्हणून यावर्षी पासून राज्यात "स्मार्ट कॉटन" हा उपप्रकल्प राबविण्यात येत आहे.जळगाव तालुक्यातील 13 गावांमध्ये या प्रकल्पाची तयारी सुरू असून यामध्ये पंधराशे शेतकऱ्यांची तीन हजार एकर शेती समाविष्ट करण्यात येणार आहे.

"एक समूह एक वाण" प्रयोग राबविणार"स्मार्ट कॉटन" उपप्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सहभागी शेतकऱ्यांना एकजिनसी व स्वच्छ कापूस जिनिंगला द्यावा लागणार आहे.जिनिंग मध्ये त्याच्या वेगळ्या गाठी तयार करण्यात येईल आणि त्याची जागतिक बाजारात विक्री झाल्यानंतर त्यावर मिळणाऱ्या नफ्याचा हिस्सा शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.या प्रकल्पात "एक समूह एक वाण" ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याने प्रत्येक समूहातील शेतकऱ्यांना एकाच जातीच्या कापसाची पेरणी करावी लागणार आहे.

तेरा गावांमधील पंधराशे शेतकऱ्यांचा समावेश तालुक्यातील अकोला खुर्द,वडगाव पाटण, झाडेगाव,वडशिंगी,भेंडवळ खुर्द,सातळी,गाडेगाव बु.,गाडेगाव खुर्द,भेंडवळ बु.,कुरणगाड खुर्द,निंभोरा खुर्द,खेर्डा खुर्द व पळसखेड या 13 गावांचा "स्मार्ट कॉटन" उपप्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. वडशिंगी,गाडेगाव बु. भेंडवळ बु. व खेर्डा खुर्द येथील प्रत्येकी 150 शेतकऱ्यांचा समावेश असून इतर गावातील शंभर शेतकरी यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडील फक्त दोन एकर शेती या "स्मार्ट कॉटन" प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे.म्हणजे पंधराशे शेतकऱ्यांच्या तीन हजार एकर शेतीचा या प्रकल्पात समावेश असेल. या कापसाच्या जिनिंगसाठी श्री सुपो जिनिंग-प्रेसिंगची निवड करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी हा प्रकल्प राबविणार आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रJalgaon Jamodजळगाव जामोदFarmerशेतकरी