शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

'लाल'परीच्या १५ हजारा फेऱ्या तोट्यात; एसटीला वर्षाकाठी २५० कोटींचा तोटा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 15:45 IST

खामगाव: राज्यातील ग्रामिण आणि दुर्गम भागात' बंधनकारक' सेवा देताना एसटीची चांगलीच दमछाक होते. इतकेच नव्हेतर या फेऱ्यांमुळे एसटीला वर्षाकाठी २५० कोटींचा तोटा सहन करावा लागतो. एसटीच्या एकुण फेऱ्यांपैकी तब्बल १५ हजारावर फेऱ्या तोट्यात असल्याची धक्कादायक बाब एसटीच्या एका अहवालातून पुढे आली आहे.

अनिल गवई

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: राज्यातील ग्रामिण आणि दुर्गम भागात' बंधनकारक' सेवा देताना एसटीची चांगलीच दमछाक होते. इतकेच नव्हेतर या फेऱ्यांमुळे एसटीला वर्षाकाठी २५० कोटींचा तोटा सहन करावा लागतो. एसटीच्या एकुण फेऱ्यांपैकी तब्बल १५ हजारावर फेऱ्या तोट्यात असल्याची धक्कादायक बाब एसटीच्या एका अहवालातून पुढे आली आहे.

 प्रवाशांच्या सेवेसाठी  हे ब्रिद असलेल्या एसटी महामंडळाची  'लालपरी'  महाराष्ट्र राज्यातील अनेकांचे प्रवासाचे मुख्य साधन आहे. शहरी आणि ग्रामीण भागाला जोडणारा दुवा म्हणूनही एसटीकडे पाहण्यात येते. तर दुर्गम आणि ग्रामीण भागाला जोडण्यासाठीही एसटीच धावून जाते. राज्यातील ३७ हजार ४१७ खेड्यांपैकी जवळपास ९० टक्के भागांमध्ये एसटीकडून प्रवासी सेवा पुरविली जाते. मात्र, ही सेवा देताना महामंडळाला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे समोर आले आहे. एसटी महामंडळाकडून फायदा आणि तोट्यातील फेऱ्यांचे वर्गीकरण केले जाते. यात अ-वर्गातील फेऱ्या म्हणजे, फायद्यातील फेऱ्या, ब-वर्गातील  फेऱ्या ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणाऱ्या तर क-वर्गातील फेऱ्या या पूर्णत: तोट्या चालणाऱ्या फेऱ्या आहेत. एसटी महामंडळाकडून सध्या ज्या फेऱ्यांना प्रतिसाद नाही अशा फेऱ्या बंद केल्या जात आहेत. ग्रामीण भागातील फेºया तोट्यात असल्या तरी, , सामाजिक बांधिलकी म्हणून महामंडळाकडून या फेऱ्या चालविल्या जात असल्याची माहिती एसटीच्या एका  वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

सक्तीची 'बंधनकारक' सेवा अडचणीची!

राज्यातील ९५ टक्के भागात एसटी महामंडळाकडून प्रवासी सेवा दिली जाते. यामध्ये ग्रामीण भागात खासकरून दुर्गम भागात प्रवाशांच्या मागणीनुसार फेऱ्या चालविण्यात येतात.  यामध्ये लोकप्रतिनिधींच्या दबावातून आणि शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी काही बंधनकारक फेऱ्यांचा समावेश आहे. बंधनकारक फऱ्यांमुळे एसटीला तब्बल २५० कोटींचा तोटा सहन करावा लागत असल्याचे समोर आले आहे.

नफा निहाय फेऱ्यांची वर्गवारी!

महामंडळाच्या दररोज एकूण ९७ हजार ६00 फेºया धावतात. यातील अ-वर्गात २४ हजार ७00 फेºयांचा समावेश आहे. तर ब-वर्गात ५७ हजार ९00 फेºयांचा समावेश असून, क-वर्गातील या १४ हजार ९६0 फेºया आहेत. म्हणजेच एकूण फेºयांपैकी १४ हजार ९६0 फेºया हा पूर्णत: तोट्यातील आहेत. या फेºयांमुळे महामंडळाला वर्षाला २५0 कोटींचा तोटा सहन करावा लागतो.

टॅग्स :khamgaonखामगावstate transportराज्य परीवहन महामंडळ