शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा  जिल्ह्यात सात महिन्यात सापडले १३९ एचआयव्ही रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 18:04 IST

बुलडाणा: जिल्ह्यात एचआयव्ही रुग्णांचे प्रमाण ०.३३ टक्केपासून आता ०.१७ टक्केपर्यंत म्हणजे जवळपास निम्म्याने कमी झाले आहे. गेल्या सात महिन्यात एड्सचे १३९ रुग्ण सापडले आहेत.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: जिल्ह्यात एचआयव्ही रुग्णांचे प्रमाण ०.३३ टक्केपासून आता ०.१७ टक्केपर्यंत म्हणजे जवळपास निम्म्याने कमी झाले आहे. गेल्या सात महिन्यात एड्सचे १३९ रुग्ण सापडले आहेत. यंदा जागतीक एड्स प्रतिबंधक दिनाच्या अनुषंगाने जिल्ह्यात ‘नो युअर एचआयव्ही स्टेट्स’वर भर देण्यात येत असून यामध्ये विविध क्षेत्रात काम करणाºया अधिकारी, कर्मचारी व लोकांची तपासणी मोहिम हाती घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. एड्सचा प्रादुर्भाव विविध कारणांमुळे होतो. हा रोग आता केवळ मोठ-मोठ्या शहरी भागातच राहिला नाही, तर सर्वत्र याचे लोन पसरले आहे. एड्स रोगावर प्रतिबंध मिळविण्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष यंत्रणाही कार्य करते. रुग्णांचे समुपदेशन करण्यापासून त्यांच्या वेळोवेळी तपासण्या करणे, मोफत औषधी पुरविणे असे अनेक उपक्रम आरोग्य विभागाकडून हाती घेण्यात आले आहेत. देशात १ डिसेंबर हा जागतीक एड्स प्रतिबंधक दिन साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एचआयव्ही रुग्णांची स्थिती जाणून घेतली असता २०१४ पासून आजपर्यंत एचआयव्ही रुग्णांचे प्रमाण निम्म्याने कमी झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात २०१४ मध्ये ३३९ रुग्ण होते. त्यानंतर २०१५ मध्ये हे प्रमाण ०.२९ वर आले म्हणजे ३२५ रुग्ण सापडले होते. २०१६ मध्ये २५४ रुग्ण तर २०१७ मध्ये २८१ रुग्ण आढळून आले. या दरम्यान एड्स रुग्णांचे प्रमाण ०.१९ टक्के होते. तर एप्रिल पासून अजपर्यंत १३९ रुग्ण सापडले असून हे रुग्णांचे प्रमाण ०.१७ वर आले आहे. प्रत्येकाने स्वत: च एचआयव्ही तपासणी करून घ्यावी, यासाठी यावर्षी ‘नो युअर एचआयव्ही स्टेट्स’ असे घोषवाक्य तयार करून त्यानुशंगाने प्रयत्न करण्यात येत आहेत. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करणाºयांची तपासणी करुन घेण्यात येणार आहे. लवकरच या मोहिमेला सुरूवात होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

सात लाख लोकांची तपासणीजिल्ह्यात एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग स्थापन झाल्यापासून सात लाख लोकांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली आहे. गेल्या नऊ वर्षात २१ टक्के लोकांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली असून त्यातील एड्स बाधीत रुग्णांना मोफत औषधी सुरू करण्यात आली आहे. जास्तीत जास्त रुग्णांची तपासणी करण्यासाठी एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. 

१२ गरोदर महिला ‘पॉझिटिव्ह’एप्रिल २०१८ पासून आजपर्यंत जिल्ह्यात ४६ हजार ७६५ लोकांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३७ हजार १८२ गरोदर महिलांचा समावेश आहे. यामध्ये एचआयव्ही बाधीत एकूण १३९ रुग्ण सापडले असून त्यात १२ गरोदर महिलांचा समावेश आहे. या सर्व रुग्णांना मोफत औषधी सुरू करण्यात आली आहे. 

प्रत्येकाने एचआयव्ही तपासणी करून घ्यावी. त्यानुसार वेळीच औषध उपचार सुरू केल्यास एड्स प्रतिबंधक व नियंत्रण मिळविण्यास मदत होते. गरोदर महिलांनी तपासणी करणे गरजेचे असून होणाºया बालकांना यापासून सुरक्षीत ठेवल्या जाऊ शकते. त्यासाठी मोफत औषधीची व्यवस्था तातडीने करण्यात येत आहे. - प्रमोद टाले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, बुलडाणा. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाHIV-AIDSएड्स