शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

पीक नुकसानापोटी १३६ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 14:56 IST

नुकसानापोटी राज्य शासनाकडून १३६ कोटी १३ लाख ९१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यास प्राप्त झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: परतीचा पाऊस व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात खरीपाच्या झालेल्या नुकसानापोटी राज्य शासनाकडून १३६ कोटी १३ लाख ९१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यास प्राप्त झाला आहे. दरम्यान, हा नुकसान भरपाईचा हा पहिला हप्ता आहे किंवा आणखी काही टप्प्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणखी नुकसान भरपाई मिळणार आहे का? याबाबत स्पष्टपणे माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.शेतकऱ्यांमध्ये असलेली राज्य शासनाप्रतीची प्रचंड नाराजी पाहता किमानपक्षी हा निधी मिळाल्याचा दिलासा शेतकºयांना मिळाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामाची तयारी करताना शेतकºयांना काही प्रमाणात आर्थिक मदत यामुळे होणार आहे.जिल्ह्यात परतीच्या व अवकाळी पावसामुळे यंदा खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले होते. जिल्ह्यात तबब्ल ४७८ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. सहा लाख ९० हजार ६०२.५४ हेक्टरवर नुकसान झाले होते. तेराही तालुक्यात खरीपाच्या नुकसानाची व्याप्ती मोठी होती. आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात जवळपास सरासरी ११ दिवस हा परतीचा व अवकाळी पाऊस पडला होता. आॅक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यात आलेल्या क्यार आणि महा चक्रीवादळामुळे देखील जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडून त्याने शेतकºयांचे खरीप पिकांचे आतोनात नुकसान केले होते. २०१४ नंतर प्रथमच जिल्ह्यात २१८ टक्के अवकाळी पाऊस झाला होता. त्यावरून या पावसाने केलेल्या नुकसानाची व्याप्ती समोर यावी. एकट्या मेहकर तालुक्यात पैनगंगा नदीकाठच्या शेतकºयांच्या दीडशे पेक्षा अधिक धान्याच्या सुड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या होत्या तर लोणार तालुक्यात सुड्या वाहून गेल्यामुळे जवळपास पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.त्या पृष्ठभूमीवर जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाने ४५० पथकांद्वारे अगदी बांधावर जावून शेतकºयांच्या झालेल्या नुकसानाचा पंचनामा केला होता. त्यानंतर जिल्ह्यात झालेल्या या नुकसानाचा अहवाल हा विभागीय आयुक्त आणि पुणे येथील कृषी आयुक्तांना सादर करण्यात आला होता. अमरावती विभागात सर्वाधिक नुकसान हे एकट्या बुलडाणा जिल्ह्यात झाल्याचे खासदार प्रतापर जाधव यांचे म्हणणे आहे. त्या पृष्ठभूमीवर किमान पक्षी मिळालेली ही मदत शेतकºयांसाठी प्रारंभीकदृष्ट्या दिलासादायक म्हणावी लागले.पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी जिल्ह्याला १३६ कोटी १३ लक्ष ९१ हजार रुपयांचा निधी शासनाकडून देण्यात आला आहे. ही मदत शेतीपिके व फळपिकांसाठी दोन हेक्टरमर्यादेत देण्यात येत असून शेती पिकांसाठी आठ हजार रुपये हेक्टरी तर बहुवार्षिक (फळपिके) पिकांसाठी १८ हजार रुपये हेक्टरी मिळणार आहे.सोबतच जमीन महसुलात सुट व शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांच्या पाल्यांना शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात माफीची सवलतही जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात बाधीत झालेल्या शेतकºयांची संख्या व नुकसानाची व्याप्ती पाहता त्वरेने मदत मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून शासनाला सादर करण्यात आलेल्या निधीच्या मागणीनुसार शासनस्तरावरून ही मदत मंजूर करण्यात आली आहे. सोबतच ही मदत जिल्हस प्राप्त झाली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे जिल्ह्यात दीड महिन्यात २५ शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे वास्तव समोर येत असतानाच राज्य शासाने किमान पक्षी ही मदत उपलब्ध केल्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. मात्र शेतकºयांचे नुकसान मोठे असून आणखी मदत शेतकºयांना केली जावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)१४ लाखांचा जमिन महसूल माफ!बुलडाणा जिल्ह्यातील शेतकºयांचा जवळपास १४ लाख रुपयांचा सामान्य जमीन महसूल यामुळे माफ झाला आहे. त्याचा शेतकºयांना काही प्रमाणात लाभ होणार आहे. जिल्ह्यात जवळपास साडेपाच लाखांच्या आसपास शेतकरी असून या शेतकºयांकडून दरवर्षी सुमारे २० रुपयांच्या आसपास सामान्य जमीन महसूल जमा करण्यात येत असतो. तो आता जमा केल्या जाणार नाही. २०१२, २०१३, २०१४ दरम्यान सुमारे ११ लाख ते १४ लाखांच्या आसपास सामान्य जमीन महसूल गोळा केल्या जात होता. तो अंदाज पाहता साधारणत: १४ लाखांच्या आसपास जिल्ह्यातील शेतकºयांचा हा जमीन महसूल माफ झाला आहे. सोबतच शेतकºयांच्या पाल्यांना शाळा, महाविद्यालयातील परीक्षा शुल्कही माफ करण्यात आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी