शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

खळेगावात सव्वाकिलो गांजा पकडला; एकाला अटक, गुटख्याच्या ६०० पुड्याही जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 8:39 PM

बिबी पोलिसांनी बारकाईने झडती घेऊन हा गांजा जप्त केला.

बुलडाणा: लोणार तालुक्यातील खळेगाव येथे बिबी पोलिसांनी छापा टाकून एक किलो ३४५ ग्रॅम वजनाचा १६ हजार १४० रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. ठाणेदार एपीआय सचिन यादव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर बिबी पोलिसांनी ही धडक कारवाई केली. विशेष म्हणजे आरोपीने त्याच्या घराच्या तिस-या मजल्यावर हा गांजा लपवून ठेवला होता.

मात्र, बिबी पोलिसांनी बारकाईने झडती घेऊन हा गांजा जप्त केला. सोबतच गुटख्याचे दहा मोठे पुडे की ज्यात ६०० गुटख्याच्या पुड्या होत्या त्याही जप्त केल्या आहेत. देऊळगाव राजाचे उपविभागीय पोलिस अधिकारी भिमानंद नलावडे हे ही या कारवाईमध्ये सहभागी झाले होते. बिबी पोलिस ठाण्याच्या परिसरात अवैध व्यवसायांना बंदी घालण्यासोबतच गुटख्याची अवैध विक्री रोखण्यासाठी बिबी पोलिसांनी गेल्या काही काळापासून धडक पावले उचलली असून त्यातंर्गतच खब-यांचे स्ट्राँग नेटवर्क येथे तयार झाले असून त्यामुळेच खळेगाव येथे गांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुषंगाने एपीआय सचिन यादव यांच्या नेतृत्त्वात नायक पोलिस कॉन्स्टेबल टेकाळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पवार, दीपक परसुवाले, महिला कॉन्स्टेबल बित्रे, नायमने, शेख रहीम, गवई यांनी आरोपी संतोष रावबा नागरे यांच्या घरात हा छापा टाकला. आरोपीचे दुकान आहे.

यावेळी आरोपीच्या घरात व दुकानात छडती घेण्यात आली असता घराच्या तिसºया मजल्यावर लपवून ठेवलेला एक किलो ३४५ ग्रॅम गुटखा पोलिसांना मिळून आला. प्रकरणी दुपार पासून ते सायंकाळी सहा पर्यंत या ठिकाणी अधिक बारकाईने बिबी पोलिसांनी झडती घेऊन हा १६ हजार १४० रुपयांचा गांजा जप्त केला. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांच्या नेतृत्त्वात ही कारवाई करण्यात आली. प्रकरणी आरोपी संतोष रावबा नागरे यास बिबी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गुटखाही जप्तया कारवाईसोबतच बिबी पोलिसांनी आरोपी संतोष रावबा नागरे यांच्या घरातून गुटख्याचे दहा पुडे जप्त केले.  त्यातील पुड्यांची सायंकाळी उशिरापर्यंत मोजदाद सुरू होती. या गुटख्याची रक्कमही अधिक असल्याची माहिती असून त्याची किंमत मात्र समजू शकली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी