सावकारांकडून बुलडाणा जिल्ह्यात १२.३० कोटींचे कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 11:46 AM2021-01-07T11:46:29+5:302021-01-07T11:48:12+5:30

Buldhana News १२२ परवानाधारक सावकारांनी १२ कोटी ३० लाख १४ हजार ९१९ रुपयांचे कर्जवाटप केल्याची माहिती समोर आली आहे.

12.30 crore loan disbursement from moneylenders in Buldana district | सावकारांकडून बुलडाणा जिल्ह्यात १२.३० कोटींचे कर्जवाटप

सावकारांकडून बुलडाणा जिल्ह्यात १२.३० कोटींचे कर्जवाटप

googlenewsNext
ठळक मुद्दे १४ हजार २६१ नागरिकांना हा कर्जपुरवठा या सावकारांनी केला आहे.११ कोटी ८४ लाख ४६ हजार ६१९ रुपयांचे कर्ज हे तारणावर दिल्या गेले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :    जिल्ह्यात कृषक व अकृषक क्षेत्रात १२२ परवानाधारक सावकारांनी १२ कोटी ३० लाख १४ हजार ९१९ रुपयांचे कर्जवाटप केल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्ह्यातील १४ हजार २६१ नागरिकांना हा कर्जपुरवठा या सावकारांनी केला आहे. यात प्राुख्याने ३६ शेतकऱ्यांना ५ लाख ६६ हजार रुपयांचे कृषी कर्ज, तर उर्वरित कर्ज हे बिगर कृषी क्षेत्रात देण्यात आले आहे. त्याचा आकडा १२ कोटी २४ लाख ४८ हजार ९१९ रुपये आहे. १४ हजार २२५ जणांनी ते घेतेल आहे. विशेष म्हणजे यापैकी ११ कोटी ८४ लाख ४६ हजार ६१९ रुपयांचे कर्ज हे तारणावर दिल्या गेले आहे, तर २१८ जणांना ४५ लाख ६८ हजार ३०० रुपयांचे कर्ज हे बिगर तारण दिल्या गेले आहे. 
दुसरीकडे गेल्या वर्षी ५५ शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यात आले असून, सावकाराच्या ताब्यात असलेली ५९ हेक्टर जमीन ही शेतकऱ्यांना परत करण्यात आली होती. अवैध सावकारीच्या जिल्ह्यात   ५९६ तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी ५११ तक्रारीमध्ये कारवाई करण्यात आलेली आहे. यापैकी अवैध सावकारी झाल्याचे ७५ प्रकरणांत सिद्ध झाले असून, अन्य प्रकरणांत कारवाई होतेय. 

घेतलेले कर्ज 
शेगाव तालुक्यात ३६ शेतकऱ्यांनी सावकारांकडून  ५ लाख ६६ हजार रुपये कर्ज घेतले आहे, तर अकृषक क्षेत्रात एकट्या शेगाव तालुक्यातल १,४४७ जणांनी एक कोटी पाच लाख ६४ हजार ५०० रुपयांचे कर्ज घेतले आहे. खामगाव तालुक्यात ९,४०० जणांनी अकृषक क्षेत्रासाठी ८ कोटी ३२ लाख ६२ हजार ८५० रुपये कर्ज घेतलेले आहे. मेहकर तालुक्यातही १ कोटी २३ लाख ५ हजार रुपयांचे १,७१० जणांनी कर्ज घेतले आहे. 


अनधिकृत सावकारी 
अवैध सावकारीच्या जिल्ह्यात नवा अधिनियम लागू झाल्यापासून ५९६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नोव्हेंबर २०२० नंतर २७ तक्रारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयास प्राप्त झालेल्या आहेत. यापैकी जवळपास ४८ प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सूत्रांनी दिली.


अधिकृत सावकारांची व्याजदर आकारणी 
अअधिकृत सावकारांकडून तारण कृषी कर्ज घेतल्यास वर्षाला ९ टक्के, बिगरतारणसाठी १२ टक्के, बिगर कृषी तारण कर्जासाठी १५ टक्के आणि बिगर कृषी बिगर तारणसाठी १८टक्के व्याजदर आकारला जातो. 

Web Title: 12.30 crore loan disbursement from moneylenders in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.