शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

नांदुरा तालुक्यात ४ वर्षात ११६ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 15:42 IST

नांदुरा: अनियमित पर्जन्यमान व दुष्काळी परिस्थितीमुळे एप्रिल २०१५ ते ३१ मे २०१९ या ४ वर्षात नांदुरा तालुक्यातील ११६ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या असल्याचे समोर आले आहे.

- सुहास वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा: अनियमित पर्जन्यमान व दुष्काळी परिस्थितीमुळे एप्रिल २०१५ ते ३१ मे २०१९ या ४ वर्षात नांदुरा तालुक्यातील ११६ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या असल्याचे समोर आले आहे. शासनाच्या निकषानुसार यातील काही मदतीस आत्महत्या पात्र तर काही अपात्र ठरल्या आहेत. परंतु नापिकीमुळे शेतकºयांचे आत्महत्येचे प्रमाण दरवर्षी वाढतच असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. आत्महत्याग्रस्त शेतकºयांमध्ये ५० वर्षे वयोगटापेक्षा कमी वय असणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात असून तरुण शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करीत असल्याचे दिसून येत आहे. परंतु शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शासनाच्या उपाययोजना मात्र शून्य असल्याचे वास्तव आहे.पावसाचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. कोरडवाहू व निसर्गाच्या भरवशावर येथील शेतकरी शेती करतो. यामुळे कर्जबाजारी शेतकºयांचा तालुका अशी ओळख नांदुरा तालुक्याची निर्माण झाली आहे. महत्वाकांक्षी जिगाव सिंचन प्रकल्प पूर्णा नदीवर या तालुक्यात साकारत असला, तरी त्याची २३ वर्षाची संथगती तालुक्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. अगोदरच या तालुक्याला खारपाणपट्ट्याचाही शाप आहे. ६३ गावे खारपाणपट्ट्यात येतात. या व इतर कारणामुळे येथील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पयार्याने शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येकडे वळत आहेत. नांदुरा तालुक्यात गत ४ वर्षांपासून ११६ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. यात सन २०१५ या आर्थिक वर्षात २१, २०१६ मध्ये २०, २०१७ मध्ये २३, २०१८ मध्ये ३४ व मे २०१९ पर्यंत १८ शेतकºयांनी मृत्यूला जवळ केले. असे असले तरी प्रशासन मात्र अजूनही सुस्त आहे.पात्र अपात्रचे निकष लावण्यापलीकडे कोणताही कार्यक्रम नसल्याने व त्याच्यासाठी खास तरतूद केली जात नसल्यामुळे याहीपुढे या तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण हे वाढतच जाणार असल्याचे दिसते. गत २ ते ३ वर्षांपूर्वी आत्महत्येचे प्रमाण लक्षात घेता शासनस्तरावरुन तणावग्रस्त शेतकºयांचे सर्वेक्षण करण्यात आले. मात्र त्यांच्यासाठी कोणताच कार्यक्रम आखल्या गेला नाही. यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. गत वषार्तील दुष्काळी स्थितीमुळे शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. अशा परिस्थितीत या वषीर्ची पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा ठाकला आहे. शासनाने पेरणीकरिता शेतकºयांना विशेष पॅकेज देण्याच्या साठी शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याkhamgaonखामगावNanduraनांदूरा