शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात गुन्हेगारीत ११ टक्क्यांची वाढ; पोलिसांची संख्या कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 11:33 IST

Buldhana Police News जिल्ह्यात पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे पोलिसांवर कामाचा ताण निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देहजार व्यक्तीमागे जिल्ह्यात अवघा एक पोलीस कर्मचारी असे प्रमाण आहे.२,७३२ पोलीस कर्मचाऱ्यांची गरज असताना प्रत्यक्षात २६०० पोलीस कर्मचारीच कार्यरत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: लोकसंख्येच्या तुलनेत जिल्ह्यात पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे पोलिसांवर कामाचा ताण निर्माण झाला आहे. त्यातच २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये जिल्ह्यात ११ टक्क्यांनी गुन्हेगारीत वाढ झाल्याचे चित्र आहे. परिणामी, जिल्ह्याची लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यात येत्या काळात  दोन टप्प्यात १२,५०० पोलिसांची भरती होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता ही बाब समोर आली. बुलडाणा जिल्ह्याची लोकसंख्या २६ लाखांच्या घरात असून प्रतिएक हजार व्यक्तीमागे जिल्ह्यात अवघा एक पोलीस कर्मचारी असे प्रमाण आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच नैसर्गिक आपत्ती, निवडणुका व तत्सम कालावधीत पोलिसांवर मोठा ताण येतो. गेल्या वर्षभरात कोरोना संसर्गामुळेही पोलिसांवर चांगलाच ताण आलेला आहे. काही पोलीस कर्मचारीही त्यामुळे प्रभावीत झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर बुलडाणा पोलीस दलात २,७३२ पोलीस कर्मचाऱ्यांची गरज असताना प्रत्यक्षात २६०० पोलीस कर्मचारीच कार्यरत आहेत. तसेच पोलीस उपनिरीक्षकांची संख्या ही ११९ हवी असताना प्रत्यक्षात ३३ पोलिस उपनिरीक्षक जिल्ह्यात कमी आहेत. पोलीस निरीक्षकांचीही संख्या जिल्ह्यात कमी आहे. त्यामुळे नियमित कामांव्यतिरिक्त अन्य कामे सांभाळून गुन्हेगारीला आळा घालताना पोलिसांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे.दुसरीकडे शहरी तथा ग्रामीण भागात लोकसंख्येनुसार किती पोलिस हवे याचे निकष वेगवेगळे आहे. मात्र आता १९६१ मधील अनुषंगीक निकष बदलण्याची खऱ्या अर्थाने गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिस दलाकडून कम्युनिटी पोलिसिंगचेही सहकार्य बुलडाणा पोलिस दल घेत आहे. त्या माध्यमातून  जनमानसामध्ये पोलिसांविषयी एक विश्वास निर्माण होऊन गुन्हे रोखण्यास त्याची मदत होत आहे. जिल्हयात पोलिस दलात अधिक सुसुत्रा येण्यासाठी दोन उपविभाग निर्मितीचे प्रस्ताव आहेत.

तुलनेने कमी मनुष्यबळ असले तरी जबाबदारी निश्चित करून गुणात्मक काम करण्यास जिल्हा पोलीस दल प्राधान्य देत आहे. पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी मधल्या काळात दंगाकाबू पथकाचे पुनर्गठन करण्यात येवून पोलीस दलातील वातावरण मैत्रिपूर्ण ठेवण्यास व पोलिसांचा ताण कमी करण्यास आपण प्राधान्य दिले आहे. यासोबतच वाहनावरील चालकांची रिक्तपदेही भरण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. वाहनांसाठी नवीन टायरचीही मागणी केलेली आहे.- अरविंद चावरिया, जिल्हा पोलीस अधीक्षक, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliceपोलिस