शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

जिल्ह्याला १ लाख ३६ हजार मेट्रिक टन खताची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2017 01:31 IST

आता खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड नंबर देणे बंधनकारक

नानासाहेब कांडलकर - जळगाव रासायनिक खतांवर शासनाकडून अनुदान दिले जात असल्याने या खतांचा पुरवठा फक्त शेतकऱ्यांनाच व्हावा, यासाठी १ जून २०१७ पासून रासायनिक खत खरेदी करताना कृषी केंद्रावर प्रत्येक शेतकऱ्याला आधार कार्ड नंबर देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कृषी केंद्रावर असलेल्या ई-पॉस मशीनवर आपल्या बोटाचा ठसा उमटविणेही गरजेचे राहणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सन २०१७-१८ ची रासायनिक खतांची मागणी १ लाख ३६ हजार मेट्रिक टन असून, तेवढा साठा वेळोवेळी जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे. तसेच खरीप ते बागायती विविध बियाण्यांची मागणी जिल्ह्याकरिता १ लाख ३६ हजार ५३९ क्विंटलची असून, त्याचीही तरतूद करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी व्ही.टी. मोकाडे व जिल्हा मोहीम अधिकारी ए.ओ. चोपडे यांनी दिली.बी-बियाणे व कीटकनाशके खरेदी करताना आधार कार्ड नंबरची गरज राहणार नाही. कारण यावर शासनाकडून अनुदान दिले जात नाही. परंतु रासायनिक खतांवर शासनाकडून सबसीडी दिली जात असल्याने रासायनिक खत निर्मितीच्या कारखानदारांना शासनाकडून तो निधी वर्ग केला जातो; परंतु तेवढी खत हे शेतकऱ्यांपर्यंत पोहचते की नाही, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता थेट लाभ हस्तांतरण प्रकल्पांतर्गत आधार कार्ड नंबर देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांना जे खतांचे भाव आहेत, त्याच भावात खते मिळणार आहे. कारण हे भाव सबसीडी गृहीत धरुनच ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे गॅस सिलींडरप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कोणताही निधी जमा होणार नाही. तसेच प्रत्येक कृषी केंद्रावर ई-पॉस मशीन ठेवण्यात येणार आहे. त्यावर शेतकऱ्यांना आपला बोटांचा ठसा द्यावा लागणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ८५० ई-पॉस मशीन पुरविण्यात येणार आहेत. कृषी केंद्रधारकांचे याबाबत प्रशिक्षणसुद्धा घेण्यात आले आहे.मागणीप्रमाणे रासायनिक खतांचा पुरवठा होणारबुलडाणा जिल्ह्यात सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात १ लाख ३६ हजार मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी आहे. तेवढा पुरवठा संबंधित कंपन्यांकडून करण्यात येणार आहे. युरिया एसएसपी, डिएपी, एमओपी, १५:१५:१५, २०:२०:१३, १०:२६:२६, १६:१६:१६, १२:१२:१६, २४:२४:०, १९:१९:१९, १७:१७:१७ अशा रासायनिक खतांची मागणी नोंदविण्यात आली आहे. बुलडाणा तालुक्याकरिता ११ हजार, चिखली तालुक्याकरिता १२ हजार २२५, देऊळगाव राजा १० हजार ७०, जळगाव जामोद ९ हजार ६४५, खामगाव ११ हजार ६७५, लोणार ८ हजार ७७५, मलकापूर १० हजार १२०, मेहकर १२ हजार २७५, मोताळा ९ हजार ७१५, नांदुरा ९ हजार ४५, संग्रामपूर १० हजार १००, शेगाव ९ हजार ९३० तर सिंदखेडराजा तालुक्याकरिता ११ हजार ४२५ मेट्रिक टन रासायनिक खतांची गरज राहणार आहे. कृषी विभागाने मागणी संबंधित विभागाला दिली असून, तेवढा पुरवठा टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे.बियाण्यांची गरज १ लाख ३६ हजार क्विंटलचीजिल्ह्यातील सर्वाधिक लागवड ही सोयाबीन पिकाची होते. अनेक शेतकरी मागील वर्षाचे सोयाबीनचे बियाणे वापरतात, तरीसुध्दा जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांची मागणी येत्या खरीप हंगामात १ लाख १५ हजार ५९० क्विंटलची राहणार आहे. ज्वारी बियाणे १३८० क्विंटल, बाजरी २५ क्विंटल, मका बियाणे ४५०० क्विंटल, तूर ५७३७ क्विंटल, मूग २७३० क्विंटल, उडीद २३४० क्विंटल, भूईमूग १७५ क्विंटल, तीळ ३७ क्विंटल व कापूस बियाणे ४०२५ क्विंटल एवढ्या बियाण्यांची गरज जिल्ह्याला राहणार आहे. तालुकानिहाय विचार केल्यास बुलडाणा तालुक्याला १३ हजार ६९४ क्विंटल, चिखलीला १४ हजार ९७४, देऊळगाव राजा ११ हजार ५६८ क्विंटल, जळगाव जामोद ६ हजार ४३२, खामगाव १२ हजार ८३४, लोणार ११ हजार ४८२, मलकापूर ७ हजार ७३७, मेहकर १५ हजार ५९०, मोताळा ६ हजार ५६७, नांदुरा ५ हजार ८४२, संग्रामपूर ६ हजार ६३७, शेगाव तालुक्याला ७ हजार ५०७ तर सिंदखेड राजा तालुक्याला १५ हजार ६७५ क्विंटल बियाण्यांची गरज भासणार आहे. तेवढी मागणी नोंदविण्यात आली असून, बियाण्यांचा पूर्ण पुरवठा होणार असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली. सिंदखेड राजा, मेहकर, लोणार, देऊळगाव राजा, बुलडाणा, चिखली, खामगाव या तालुक्यांची बियाण्यांची मागणी सर्वाधिक आहे. तुलनेत इतर तालुक्यांची बियाण्यांची मागणी कमी आहे. बियाण्यांवर शासन अनुदान देत नसल्याने याकरिता आधार कार्ड नंबर व ई-पॉस मशीनमध्ये बोटांचा ठसा उमटविण्याची गरज नसल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली.