‘जीएसटी’ने टाकले मूर्तिकारांना संभ्रमात, पूजेच्या गणेशमूर्तींना १०० टक्के सूट मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 01:20 AM2017-08-20T01:20:04+5:302017-08-20T01:20:56+5:30

विघ्नहर्ता अर्थात गणपतीमूर्तीच्या निर्मितीत सुप्रसिद्ध गणेशनगरी पेणमधील सुमारे २००० गणेश मूर्तिकारांच्या समोर यंदा प्रथमच नव्याने लागू झालेल्या ‘जीएसटी’ करप्रणालीच्या संभ्रमाचे मोठे विघ्न निर्माण झाले आहे.

 GST gets 100 percent discount for Ganesh idol worshiped by sculptors | ‘जीएसटी’ने टाकले मूर्तिकारांना संभ्रमात, पूजेच्या गणेशमूर्तींना १०० टक्के सूट मिळावी

‘जीएसटी’ने टाकले मूर्तिकारांना संभ्रमात, पूजेच्या गणेशमूर्तींना १०० टक्के सूट मिळावी

googlenewsNext

- जयंत धुळप

विघ्नहर्ता अर्थात गणपतीमूर्तीच्या निर्मितीत सुप्रसिद्ध गणेशनगरी पेणमधील सुमारे २००० गणेश मूर्तिकारांच्या समोर यंदा प्रथमच नव्याने लागू झालेल्या ‘जीएसटी’ करप्रणालीच्या संभ्रमाचे मोठे विघ्न निर्माण झाले आहे. ७० हजारांच्या वर गणेशमूर्तींची निर्मिती होऊन त्या रवानाही झाल्या आहेत. एकूण हा सर्व व्यवसाय ९० कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. जीएसटी करप्रणाली ऐन कामाच्या वेळीच अमलात आल्याने नेमकी ती काय आहे, त्याचे रजिस्ट्रेशन करायला हवे आदी बाबी जाणून घेण्यासाठीदेखील गणेश मूर्तिकारांना सवड मिळालेली नाही, अशी माहिती पेण गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष तथा चौथ्या पिढीचे गणेश मूर्तिकार श्रीकांत देवधर यांनी दिली आहे.
जीएसटीचा विचार करायला उसंतच नाही
पेण गणेश मूर्तिकार संघटनेचे सद्य:स्थितीत १५० सदस्य आहेत. मात्र त्याव्यतिरिक्त हमरापूर, जोहे, वाशी या प्रमुख गावांसह संपूर्ण तालुक्यात सुमारे २००० गणेश मूर्तिकार आहेत. या सर्वांच्या माध्यमातून होणाºया गणेशमूर्ती निर्मिती व्यवसायात दीड लाख कारागिरांना विविध प्रकारचा रोजगार वर्षभर उपलब्ध होतो. जून आणि जुलै हे दोन महिने कोणत्याही मूर्तिकारास गणपतीमूर्ती रवाना करणे या कामातून बिलकूल उसंत मिळत नाही.
कच्च्या मालावर यंदा जीएसटी द्यावा लागला नाही
१ जुलै २०१६ रोजी ‘जीएसटी’ लागू झाला. आमची सर्व खरेदी म्हणजे मूर्तिकामाकरिता माती, इतर सामान आणि रंग या सगळ्याची खरेदी त्यापूर्वीच झालेली होती. त्यामुळे त्या खरेदीवर आम्हाला जीएसटी द्यावा लागला नाही. त्यामुळे सारे मूर्तिकार त्यातून बचावले असल्याचे देवधर यांनी सांगितले. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे कच्च्या मूर्तीची रवानगी ही एप्रिल आणि मे महिन्यातच होते, त्यामुळे त्या मूर्तींना देखील जीएसटी लागला नाही. उर्वरित सुमारे ५५ हजार मूर्ती विविध मूर्तिकारांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही आॅस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड, मॉरिशस, सिंगापूर आणि दुबईमध्ये
यंदाही पाठविण्यात आल्या; परंतु त्यांनाही जीएसटी लागलेला नसल्याचे देवधर यांनी सांगितले.

पूजेच्या गणेशमूर्तींना १०० टक्के सूट मिळावी
मुळात पूर्वी अस्तित्वात असलेल्या विक्री करातून पूजेच्या गणेशमूर्तींना सूट होती. त्याचप्रमाणे जीएसटीमधूनही सूट मिळावी, अशी आमची मागणी आहे. परंतु त्याचा पाठपुरावा करण्याकरिता संघटना वा व्यक्तिगत मूर्तिकारांना सवड झालेली नाही. दरम्यान, प्रारंभी गणेश मूर्तींकरिता असणारा १८ टक्के असलेला जीएसटी ५ टक्के केल्याची माहिती उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

२० लाखांच्या आत व्यवसाय दाखवून जीएसटी बचाव
२० लाखांच्या आतल्या व्यावसायिकाला जीएसटी लागू नाही. २० ते ७५ लाखांतील व्यावसायिकाला २ ते ५ टक्के जीएसटी आहे, तर ७५ लाखांच्या वरच्या व्यावसायिकाला तो १५ टक्के वा त्यावर आहे. अशा परिस्थितीत एक कोटीचा गणेशमूर्तींचा व्यवसाय करणाºया व्यावसायिकांनी आपला हा व्यवसाय आपल्या चार भावांच्या नावावर करून यंदाच्या वर्षी आपला व्यवसाय प्रत्येकी २० लाखांच्या आतला दाखवून जीएसटीमधून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती नाव न जाहीर करण्याच्या अटीवर पेणमधील एका गणेश मूर्तिकाराने दिली आहे. परंतु जीएसटीच्या बाबतीत गणेश मूर्तिकारांना नेमके काय करायचे हे समजलेले नाही. त्यामुळे सर्वांचीच मोठी संभ्रमावस्था झाली आहे.

Web Title:  GST gets 100 percent discount for Ganesh idol worshiped by sculptors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.