आयकर विवरण भरण्याच्या प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 01:39 AM2018-04-08T01:39:42+5:302018-04-08T01:39:42+5:30

भारतात दोन प्रकारचे कर आहेत - प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष कर म्हणजे, आपल्या उत्पन्नावर सरकारला प्रत्यक्षपणे भरावा लागणारा कर. हा कर व्यक्ती आणि कॉर्पोरेट संस्थांवर थेट आकारला जातो.

The process of filling income tax details | आयकर विवरण भरण्याच्या प्रक्रिया

आयकर विवरण भरण्याच्या प्रक्रिया

- प्रतीक कानिटकर

भारतात दोन प्रकारचे कर आहेत - प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष कर म्हणजे, आपल्या उत्पन्नावर सरकारला प्रत्यक्षपणे भरावा लागणारा कर. हा कर व्यक्ती आणि कॉर्पोरेट संस्थांवर थेट आकारला जातो. आयकर, संपत्ती कर, भेटवस्तू, भांडवली लाभ कर यांचा थेट करात समावेश होतो. आयकर हा सर्वश्रुत करप्रकार आहे. उत्पन्न पातळीनुसार कर स्लॅबच्या मिळकतीच्या उत्पन्नावर तो लागू होतो. इन्कम टॅक्स रिटर्न्सच्या माध्यमातून आपली कमाई, व्यवसायातील नफा अथवा नुकसान, अन्य कपात, कराचा परतावा किंवा कर देयकाबद्दल तपशीलवार सूचना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कळवितो. या लेखात आपण इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याच्या प्रक्रिया पाहू.

कलम १३९ (१) नुसार आर्थिक वर्ष २०१७ - २०१८ करिता खालीलपैकी कोणत्याही परिस्थितीत भारतामध्ये आयकर विवरण (इन्कमटॅक्स रिटर्न्स) भरणे हे कायद्याने अनिवार्य आहे:
- तुमचे एकूण उत्पन्न २०१७ - २०१८ या आर्थिक वर्षात रुपये अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास
- ही मर्यादा ज्येष्ठ नागरिकांसाठी रुपये ३ लाख (६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले, परंतु ८० वर्षांपेक्षा कमी असलेले), तसेच अतिज्येष्ठ नागरिकांसाठी रुपये ५ लाख (८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले) अशी आहे.
- आपण कंपनी किंवा फर्म म्हणून रजिस्टर असल्यास आणि वित्तीय वर्षातील उत्पन्न किंवा तोटा नोंदवत असल्यास, आपण आयकर परताव्याचा (इन्कम टॅक्स रिफंड) दावा करू इच्छित असल्यास, आपल्याला व्यवसायिक नुकसान पुढील वर्षीच्या प्रॉफिटमधून वजा करायचे असल्यास (लॉस कॅरी फॉरवर्ड करावयाचा असल्यास).
- जर तुम्हाला वित्तीय वर्षातील म्हणजेच २०१७- २०१८ वर्षातील, कंपनीच्या इक्विटी शेअर्सच्या विक्रीतून किंवा इक्विटी म्युच्युअल फंडाच्या युनिटच्या विक्रीतून किंवा बिझनेस ट्रस्ट युनिटच्या विक्रीतून लाँगटर्म कॅपिटल गेन्समधून सूट मिळाली असल्यास, अशा व्यक्तींनी इन्कम टॅक्स रिटर्न भरणे अनिवार्य आहे.
- जर आपण कायद्याने भारतीय निवासी आहात आणि भारताबाहेर असलेल्या एखाद्या संपत्तीमध्ये अथवा संस्थेमध्ये आपल्याकडे आर्थिक मालमत्ता असल्यास, आपणास इन्कम टॅक्स रिटर्न भरणे अनिवार्य आहे.
- जर आपण परदेशी कंपनी असल्यास, भारतातील एखाद्या व्यवहारावर संमती घेत आहात, तर कर्जासाठी किंवा व्हिसासाठी अर्ज केल्यावर रिटर्न फायलिंगचा पुरावादेखील आवश्यक असू शकतो.
- आर्थिक वर्ष २०१७ - २०१८ पासून, नवीन कायद्यानुसार, आयकर विवरण (इन्कमटॅक्स रिटर्न्स) देय तारखेनंतर म्हणजेच, ३१ जुलै २०१८ नंतर दाखल केले असता, ५००० रुपये दंड आकारण्यात येईल व ३१ डिसेंबर, २०१८ नंतर दाखल केल्यास, दहा हजार रुपये इतका दंड आकारण्यात येईल.
आयकर विवरण (इन्कमटॅक्स रिटर्न्स) देय तारखेच्या आत दाखल केल्याचे प्रमुख फायदे:
१. दंडापासून व खटल्यांपासून बचाव - आपल्या क्रेडिट कार्ड किंवा फोन बिलाची रक्कम उशिरा देण्यामुळे दंड आकारला जातो, तसेच देय तारखेनंतर म्हणजेच ३१ जुलैनंतर इन्कमटॅक्स रिटर्न्स दाखल केले असता दंड आकारला जातो. अशा परिस्थितीत, दंड स्वरूपातील व्याजदर हा प्रतिमहिना १% इतका आहे, शिवाय जर ही न भरलेली रक्कम रु. ३,०००/- हून अधिक असल्यास, आयटी विभाग प्रत्यक्षात आपल्याविरुद्ध फौजदारी खटला आरंभ करू शकतात. अशा संभाव्य दंडापासून व खटल्यांपासून बचाव करण्यासाठी वेळेवर आपला आयटीआर दाखल करणे हे इष्ट ठरते.
२. आपल्या इन्कमटॅक्स रिटर्न्समध्ये सुधारणा करण्यासाठी संधी मिळते- इन्कमटॅक्स रिटर्न्स फायलिंग प्रक्रिया सरलीकृत जरी झाली असली, तरीही दुर्लक्ष केलेल्या उत्पन्नाच्या स्वरूपात चुका होऊ शकतात, करलाभ कमी-अधिक होऊ शकतात. जर आपण वेळेवर आपल्या आयटीआरची नोंदणी केली असेल, तर तुम्हाला देय झाल्यानंतरही तुमचे रिटर्न्स सुधारण्याची संधी मिळते. म्हणजेच आपण चालू आर्थिक वर्षाच्या समाप्तीपूर्वी म्हणजेच, ३१ मार्च, २०१९ पूर्वी सुधारित रिटर्न दाखल करू शकता.
३. परताव्यावरील व्याज मिळण्यास सुलभता- जर परतफेड रक्कम (रिफंड रक्कम) ही एकूण देय कराच्या १० टक्कयांपेक्षा अधिक असेल, तर करदात्यास तश्या अतिरिक्त करावर ६ टक्के वार्षिक व्याज मिळू शकते. आगाऊ कर (अ‍ॅडव्हान्स टॅक्स) किंवा टीडीएसमार्फत अतिरिक्त परतावा देणाऱ्या व्यक्तींसाठी अशा रिफंड्स सर्वात जास्त उपलब्ध आहेत. जर आयटीआर निहित तारखेमध्ये दाखल केला असेल, तर रिफंडवर लागू असलेले व्याज मिळण्यास सुकर ठरते, परंतु करदात्याने इन्कमटॅक्स रिटर्न्स उशिरा दाखल केल्याच्या बाबतीत, ज्या तारखेस इन्कमटॅक्स रिटर्न्सवर प्रक्रिया केली जाते, म्हणजेच जर तुमच्याकडे मोठा कर परतावा आला असेल, तर व्याज गमावले जाऊ शकते.
४. व्यावसायिक नुकसान पुढील वर्षीच्या प्रॉफिटमधून वजा करण्यास वाव (लॉस कॅरी फॉरवर्ड करावयाचा असल्यास) - जर तुम्हाला व्यवसायातील उत्पन्न, भांडवली लाभ, अन्य स्रोतांकडून मिळणारे उत्पन्न यात नुकसान झाले असल्यास, ते पुढील आर्थिक वर्षासाठी अग्रेषित केले जाऊ शकते आणि त्यानंतरच्या वर्षातील कर सवलत प्रदान करू शकते. मात्र, आयटीआर देय तारखेनंतर दाखल झाल्यास, अशा स्वरूपाचे नुकसान पुढील वर्षाकरिता कॅरी फॉरवर्ड केले जाऊ शकत नाही.
५. बँक किंवा पतपेढी कर्ज देताना, तसेच क्रेडिट कार्ड कंपनी विनातारण कर्ज देताना इन्कमटॅक्स रिटर्न्सवर सर्वाधिक भर- जर आपण भविष्यात गृहकर्ज, वाहन कर्ज, कार कर्ज इत्यादीसाठी अर्ज करण्याची योजना आखत असाल, तर बहुतेक कर्जदार मागील (३) तीन वर्षांच्या इन्कमटॅक्स रिटर्न्सचा पुरावा मागतात. खरे तर आपण सह-कर्जदार (गॅरेंटर) म्हणून कर्ज घेण्यासाठी अर्ज करू इच्छित असल्यास, आपण आपल्या जोडीदाराचे परतावे दाखल करणे अनिवार्य आहे. येथे एक सामान्य गैरसमज आहे की, कर देय नसेल तर कर रिटर्न भरण्याची गरज नाही. इन्कमटॅक्स रिटर्न्स वेळेत दाखल केल्याने, बँकांना आपली आर्थिक स्थिती आणि कर्जाची परतफेड करण्याची क्षमता समजण्यास मदत होते. आपल्या कर्जाच्या अर्जाची जलद परवानगी मिळविण्यामध्ये इन्कमटॅक्स रिटर्न्सना विशेष महत्त्व आहे.
६. सुकर व्हिसा प्रक्रिया- जर आपण परदेशी जाण्याचा विचार करत असाल, तर स्वत:ला आगाऊ तयार करा. व्हिसा अर्ज केल्यावर बहुतेक दूतावास आणि वाणिज्य दूतांसाठी आपल्याला मागील दोन वर्षांपासून आपल्या कर रिटर्नची प्रती सादर करणे आवश्यक आहे. यूएस, यूके, कॅनडा किंवा युरोपसाठी व्हिसासाठी अर्ज करताना हे लागू होते.
अलीकडच्या वर्षांत, आर्थिक स्थिरतेचे पुरावे म्हणून बँकांना आयकर प्रमाणपत्राची मुदत आणि परदेशी व्हिसा देणाºया अधिकाºयांमार्फत आयटीआर जमा करण्याची मागणी केली जाते.
जर आपल्या आयटीआरने दाखविले की,
देय दिनांकानंतर ती दाखल केली गेली आहेत,
तर कदाचित आपल्या क्रेडिट पात्रतेची/वित्तीय शिस्तीबाबत चुकीची धारणा होऊ शकते आणि
हे आपण वेळेवर आपला कर रिटर्न भरून
टाळू शकतो आणि म्हणूनच इन्कमटॅक्स रिटर्न्स)
देय तारखेच्या आत दाखल करणे हे नेहमीच
महत्त्वाचे ठरते.

Web Title: The process of filling income tax details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Taxकर