शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सत्तास्थापनेच्या चक्रव्यूहात अडकले जिल्हा परिषद सदस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2022 05:00 IST

जनतेने निवडून तर दिले. अधिकारी मात्र मिळाले नाहीत. जिल्हा परिषदेत बसायचा सन्मानही कुणी देत नाही. आता सत्तास्थापनेवरून सर्वच सदस्य आक्रमक आहेत; परंतु आपला आक्रमकपणा दाखवायची सोय नाही. कोण कुणाबरोबर बसेल याची अद्यापही खात्री नाही. त्यामुळे नेत्याला नाराज करून चालेल कसे. मिळणारे संभाव्य पदही मिळणार नाही. त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार निवडून आलेले सदस्य सहन करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सत्तास्थापनेसाठी आक्रमक व्हावे, तर नेते नाराज होतील. मिळणारे संभाव्य पदही मिळणार नाही. दुसरीकडे ग्रामविकास मंत्रालयाकडून तीन महिने झाले तरी अधिसूचना जारी नाही. अशा चक्रव्यूहात निवडून आलेले जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य अडकले आहेत. आता तीन महिने व्हायला आले तरी सत्तास्थापनेचे कोणतेही चिन्ह दिसत नाही.भंडारा जिल्हा परिषद व सात पंचायत समिती निवडणूक २१ व १८ जानेवारी अशा दोन टप्प्यात पार पडली. १९ जानेवारी रोजी एकत्र मतमोजणी झाली. जिल्हा परिषदेचे ५२ आणि पंचायत समितीचे १०४ सदस्य निवडून आले. जिल्हाधिकाऱ्यांनी निवडून आलेल्या या सदस्यांना विजयी प्रमाणपत्रही दिले. सत्तास्थापनेच्या हालचालींनी वेग घेतला होता. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने जुळवाजुळव सुरू होती. मात्र, सत्तास्थापनेची अधिसूचनाच निघाली नाही. आता जवळपास तीन महिने होत आहे. ५२ जिल्हा परिषद सदस्य आणि १०४ पंचायत समिती सदस्य प्रतीक्षेत आहेत. जनतेने निवडून तर दिले. अधिकारी मात्र मिळाले नाहीत. जिल्हा परिषदेत बसायचा सन्मानही कुणी देत नाही.आता सत्तास्थापनेवरून सर्वच सदस्य आक्रमक आहेत; परंतु आपला आक्रमकपणा दाखवायची सोय नाही. कोण कुणाबरोबर बसेल याची अद्यापही खात्री नाही. त्यामुळे नेत्याला नाराज करून चालेल कसे. मिळणारे संभाव्य पदही मिळणार नाही. त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार निवडून आलेले सदस्य सहन करीत आहेत. आज होणार, उद्या होणार असे म्हणत आता तीन महिने होत आहेत; परंतु सत्ता स्थापना मात्र होताना दिसत नाही. सदस्यांच्या अधिकाराचे हणण होत असले तरी राजकीय नेते मात्र चुप्पी साधून आहेत.

मंत्रालयासमोर आंदोलनाची तयारी

- जिल्हा परिषदेतील सत्तास्थापनेचा तिढा सुटायचे नाव घेत नाही. यामुळे अस्वस्थ झालेले जिल्हा परिषद सदस्य आता आंदोलनाच्या तयारीत आहेत. भाजपचे गटनेते विनोद बांते म्हणाले, लवकरच सत्तास्थापन झाले नाही, तर मुंबई मंत्रालयासमोर सर्वपक्षीय जिल्हा परिषद व पंचायत समितीचे नेते आंदोलन करणार आहेत. मात्र या आंदोलनाला सर्वपक्षीय नेते साथ देणार काय, असाही प्रश्न आहे. काही सदस्यांनी न्यायालयात जाण्याची तयारी चालविली आहे. एकंदरीत सत्ता स्थापनेच्या तिढ्याने निवडून आलेले सदस्य मात्र चांगलेच वैतागले आहे.

३१ मार्चची   डेडलाईनही संपली- आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी जिल्हा परिषदेचा निधी पदरात पाडून घेण्यासाठी सत्तास्थापनेस विलंब होत असल्याची चर्चा होत होती. ३१ मार्च संपले की सत्तास्थापनेची अधिसूचना जारी होईल, अशी आशा होती. मात्र, आता आठवडा उलटला तरी अधिसूचना जारी झाली नाही. नेते काही बोलायला तयार नाहीत.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद