शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल वाजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 05:00 IST

भंडारा जिल्हा परिषदेची मुदत जुलै २०२० मध्ये संपली. त्या काळात काेराेना संसर्ग माेठ्या प्रमाणात असल्याने ही निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली. त्यामुळे १२ जुलै २०२० राेजी भंडारा जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता १४ महिन्यांपासून जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासक चालवित आहेत. आता काेराेना संसर्ग कमी झाला असून, भंडारा जिल्हा काेराेनामुक्त आहे. त्यामुळे लवकरच निवडणुका हाेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : काेराेना संसर्गामुळे निवडणूक हाेऊ न शकल्याने गत १४ महिन्यांपासून प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजण्याचे संकेत आहेत. राज्य निवडणूक आयाेगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सुधारित आरक्षण साेडत कार्यक्रम जाहीर केला आहे. तर दुसरीकडे मंडईच्या माध्यमातून इच्छुक गावागावांत जाऊन माेर्चे बांधणी करीत आहेत.भंडारा जिल्हा परिषदेची मुदत जुलै २०२० मध्ये संपली. त्या काळात काेराेना संसर्ग माेठ्या प्रमाणात असल्याने ही निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली. त्यामुळे १२ जुलै २०२० राेजी भंडारा जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता १४ महिन्यांपासून जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासक चालवित आहेत. आता काेराेना संसर्ग कमी झाला असून, भंडारा जिल्हा काेराेनामुक्त आहे. त्यामुळे लवकरच निवडणुका हाेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशातच ८ नाेव्हेंबर राेजी राज्य निवडणूक आयाेगाने भंडारा जिल्हा परिषद व त्या अंतर्गत सात पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात सुधारित आरक्षण साेडत जाहीर केली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी एक पत्रही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सर्व तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना निर्गमित केले आहे.भंडारा जिल्हा परिषदेवर गतवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता हाेती. काँग्रेसचे रमेश डाेंगरे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हाेते. पाच वर्षांचा जिल्हा परिषदेचा कार्यकाळ पूर्ण झाला. मात्र त्याचवेळी राज्यात काेराेना संसर्ग शिगेला पाेहाेचला हाेता. त्यामुळे सहा महिन्यांची मुदतवाढ मिळणार अशी शक्यता हाेती. मात्र ११ जुलै २०२० राेजी जिल्हा परिषद बरखास्त करून १२ जुलै राेजी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली.आता सुधारित आरक्षण साेडत कार्यक्रम जाहीर झाल्याने लवकरच निवडणुकाही घाेषित हाेतील अशी अपेक्षा आहे. सर्वच पक्ष जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी गत सहा महिन्यांपासून तयारी करताना दिसत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना यासह इतर पक्ष आणि आघाड्याही निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहेत. युती - आघाडी हाेणार की सर्वच पक्ष स्वतंत्र लढणार, हे मात्र अद्यापही निश्चित नाही. एकदा निवडणुकीची तारीख घाेषित झाल्यानंतर सर्व काही ठरणार आहे. परंतु इच्छुक मात्र आतापासूनच कामाला लागले आहेत. कधीही न  दिसणारे आता गावागावात दिसायला लागले आहेत. दिवाळीनंतर सुरू झालेल्या मंडईनिमित्त ही मंडळी आणखी जागरूक झाली आहे.

सुधारित आरक्षण साेडत १२ नाेव्हेंबर राेजी- भंडारा जिल्हा परिषद व पवनी पंचायत समितीमधील नागरिकांचा मागासप्रवर्ग, महिला तसेच सर्वसाधारण महिलांसाठी साेडत पद्धतीने आरक्षणाची कार्यवाही १२ नाेव्हेंबर राेजी दुपारी १२ वाजता जिल्हा नियाेजन सभागृह आणि पंचायत समितीसाठी पवनी तहसील कार्यालयात विशेष सभा घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रहिवाशांना या सभेत हजर राहावयाचे असल्यास त्यांना काेराेना नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.- अधिनियमातील तरतुदीनुसार भंडारा जिल्हा परिषदेमधील राखीव जागावरील आरक्षण ५० टक्केच्या मर्यादित सीमित राखताना नागरिकाच्या मागास प्रवर्गातील एक जागा अधिक हाेत आहे. तसेच पवनी पंचायत समितीमध्ये या प्रवर्गाची एक जागा अधिक हाेत आहे. ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली जात असल्याने पुन्हा आरक्षण साेडत काढण्यासाठी राज्य निवडणूक आयाेगाने कार्यक्रम जाहीर केला आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूक