करडी ओपन मॅरेथाॅन स्पर्धेत धावली पूर्व विदर्भातील तरुणाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:52 AM2021-02-23T04:52:52+5:302021-02-23T04:52:52+5:30

स्वामी विवेकानंद जयंती प्रीत्यर्थ ट्रँकस्टार क्रीडा मंडळ करडी आणि सुमतीबाई पांडुरंग देव मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या ...

Youth from East Vidarbha ran the Kardi Open Marathon | करडी ओपन मॅरेथाॅन स्पर्धेत धावली पूर्व विदर्भातील तरुणाई

करडी ओपन मॅरेथाॅन स्पर्धेत धावली पूर्व विदर्भातील तरुणाई

Next

स्वामी विवेकानंद जयंती प्रीत्यर्थ ट्रँकस्टार क्रीडा मंडळ करडी आणि सुमतीबाई पांडुरंग देव मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जस्टीस पी. पी. देव मेमोरियल मॅरेथॉन स्पर्धा रविवारी सकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आली होती. आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.

बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी करडीचे ठाणेदार नीलेश वाजे, तर विशेष म्हणजे प्रायोजक एस. टी. देव ट्रस्टचे ट्रस्टी असावरी पराग कुळकर्णी, बागेश्री मोहन पांडे व सानिकाताई कुलकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते . स्पर्धक करडी बस स्टॉप चौक येथून पालोरा पर्यंत धावले. बाहेरुन आलेल्या स्पर्धकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था विजय बहुउद्देशीय क्रीडा मंडळ करडी व ट्रॉकस्टार क्रीडा मंडळाचे वतीने करण्यात आली होती. स्पर्धेतील सहभागी खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी व बक्षीस वितरण प्रसंगी आ. राजू कारेमोरे, करडीचे ठाणेदार नीलेश वाजे, निशिकांत इलमे, वासुदेव बांते, नीलिमा इलमे, महेंद्र शेंडे, महादेव पचघरे, उमेश इलमे, वामन राऊत, गौरीशंकर सिंदीपुरे, भूपेन्द्र साठवणे, श्रीकांत डोरले, डॉ. पी. जी. तलमले, चंद्रकुमार सेलोकर, कय्युम शेख, कमलक्रुष्ण कुर्वे, जयंत तांडेकर, सुनील पंचबुद्धे, देवदास तुमसरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

स्पर्धा मुख्यत: दोन भागात विभाजित करण्यात आली होती. खुला गट:- (पुरुष व महिला), १४ वर्षा खालील:- (मुल व मुली), ४० वर्षावरील (पुरुष व महिला) या सर्वांनी स्पर्धेत सहभागी होत ग्रामस्थ व आयोजकांचे मनोबल उंचावले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. सुमतीबाई पांडुरंग देव मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टच्या ट्रस्टी आसावरी कुलकर्णी विजय क्रीडा मंडळाचे अध्यक्ष उमेश इलमे व पदाधिकारी तसेच ट्रॅकस्टार क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Youth from East Vidarbha ran the Kardi Open Marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.