शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उसर्रा पुलाने घेतला आणखी एक बळी; नागपूर जिल्ह्यातील तरुण अपघातात ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2022 14:28 IST

स्वागत समारंभाचा कार्यक्रम आटोपून हे तिघेही एका दुचाकीने नयाकुंड येथे रात्री जात होते.

उसर्रा (भंडारा) : तुमसर - रामटेक मार्गावरील उसर्रा पुलाजवळ काम खोळंबल्याने अनेक अपघात होत असून, बुधवारी रात्री पुन्हा एका तरुणाचा बळी गेला. लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून गावी जाताना दुचकी स्लीप होऊन झालेल्या अपघातात नागपूर जिल्ह्यातील एक तरुण ठार, तर दोनजण जखमी झाले.

हा अपघात उसर्रा पुलाजवळ बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास घडला. प्रज्वल जालंधर गायकवाड (२५, रा. नयाकुंड, ता. पारशिवणी, जि. नागपूर) असे मृताचे नाव आहे, तर अरविंद अमरदीप गजभिये (२६) आणि श्रावण पुरुषोत्तम गजभिये (१५, दाघे रा. नयाकुंड) अशी जखमींचे नावे आहेत. उसर्रा येथील राहुल बोरकर यांचा विवाह पारसिवणी येथे मंगळवारी पार पडला. बुधवारी रात्री नयाकुंड येथील पाहुणे स्वागत समारंभासाठी आले होते. त्यात प्रज्वल गायकवाड, अरविंद गजभिये, श्रावण गजभिये यांचा समावेश होता. स्वागत समारंभ आटोपून हे तिघेही एका दुचाकीने नयाकुंड येथे रात्री जात होते.

तुमसर ते रामटेक मार्गावरील उसर्रा येथील पुलाजवळ एकेरी सिमेंट रस्त्याने जात असताना समोरून आलेल्या वाहनाचा प्रखर प्रकाश दुचाकी चालक प्रज्वलच्या डोळ्यावर पडला. त्यामुळे त्याला पुढचे काहीच दिसले नाही. त्यामुळे दुचाकी एकेरी रस्त्याच्या खाली उतरली. पुन्हा रस्त्यावर येताना दुचाकी स्लीप होऊन तिघेही खाली कोसळले. प्रज्वलला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला, तर अरविंद व श्रावण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच आंधळगाव पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

आणखी किती बळी जाणार?

तुमसर ते रामटेक राज्य मार्गावर उसर्रा पुलाजवळ गेल्या तीन वर्षांपासून रस्त्याचे काम खोळंबले आहे. हा रस्ता एकेरी असून, रात्री वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. या रस्त्यावर आतापर्यंत अनेक अपघात झाले असून, काहींचा यात बळी गेला आहे. या रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करावे, यासाठी गावकऱ्यांनी आंदोलनही केले होते. मात्र, रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे किती बळी गेल्यानंतर रस्ता दुरूस्त होणार असा प्रश्न गावकरी करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातbhandara-acभंडाराDeathमृत्यू