लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : धान रोवणीसाठी शेतात चिखलणी करतांना ट्रॅक्टर उलटून चालक जागीच ठार झाला. ही घटना तालुक्यातील मडेघाट येथे सोमवारी दुपारी १ वाजता घडली.संदिप आंदराव ढोरे (२८) रा. कन्हाळगाव असे मृताचे नाव आहे. मडेघाट येथील बालू राऊत यांच्या शेतात धान रोवणीसाठी सोमवारी ट्रॅक्टरने चिखलणी काम सुरु होते. दुपारी १ वाजताच्या सुमारास ट्रॅक्टर चिखलात अडकला. चालक संदिपने ट्रॅक्टरच्या मागील चाकात लाकडी खांब टाकून फसलेला ट्रॅक्टर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नियंत्रण सुटून ट्रॅक्टर उलटला. त्यात ट्रॅक्टखाली चालक संदिप दबल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती शेतशिवारातील होताच अनेकांनी शेतात धाव घेतली. लाखांदूर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी ट्रॅक्टरखाली दबलेला मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढून पंचनामा केला. या आकस्मिक अपघातीमृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
शेतात चिखलणी करतांना ट्रॅक्टर उलटून तरुण जागीच ठार; भंडारा जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 14:43 IST
Bhandara news धान रोवणीसाठी शेतात चिखलणी करतांना ट्रॅक्टर उलटून चालक जागीच ठार झाला. ही घटना भंडारा तालुक्यातील मडेघाट येथे सोमवारी दुपारी १ वाजता घडली.
शेतात चिखलणी करतांना ट्रॅक्टर उलटून तरुण जागीच ठार; भंडारा जिल्ह्यातील घटना
ठळक मुद्देलाखांदूर तालुक्याच्या मडेघाटची घटना