शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

दगडाने ठेचून तरुणाचा निर्घृण खून, मारेकऱ्यांचा थांगपत्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 18:40 IST

रोशन बुधवारी सायंकाळी ४ वाजता घरुन निघाला मात्र, परतला नाही. त्यामुळे घरच्यांनी त्याचा शोध घेतला असता गुरुवारी दुपारी २ वाजता त्याचा मृतदेह कांद्रीपासून तीन किलोमीटर अंतरावर बोंद्री ते पांजरा रस्त्यावर नाल्यात आढळून आला.

ठळक मुद्देकांद्रीची घटना

भंडारा : दगडाने ठेचून एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना मोहाडी तालुक्यातील कांद्री शिवारातील एका नाल्यात गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. बुधवारी सायंकाळी ४ वाजतापासून तो बेपत्ता होता. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अद्याप मारेकऱ्यांचा मात्र थांगपत्ता लागला नव्हता.

रोशन रामू खोडके (२८) रा.कांद्री असे मृत तरुणाचे नाव आहे. तो बुधवारी सायंकाळी ४ वाजता घरुन निघाला मात्र, रात्री घरी परतला नाही. त्यामुळे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु तो कुठेही आढळून आला नाही. दरम्यान गुरुवारी दुपारी २ वाजता त्याचा मृतदेह कांद्रीपासून तीन किलोमीटर अंतरावर बोंद्री ते पांजरा रस्त्यावर नाल्यात आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्याच्या डोक्यावर दगडाने प्रहार करुन त्याचा खून केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. तसेच शरीरही छिन्नविछिन्न झाले आहे.

खुनाची माहिती गावात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. आंधळगाव पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. ठाणेदार सुरेश मट्टामी घटनास्थळी दाखल झाले. नाल्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. या खुनाची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोषसिंग बिसेन यांनी घटनास्थळाला भेट दिली. श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते.

खून करुन नाल्यात फेकला मृतदेह

रोशन खोडके याचा बुधवारी रात्रीच खून केला असावा असा कयास आहे. घटनास्थळावरुन २५ ते ३० मीटर अंतरावर त्याला मारण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह ओढत आणून नाल्यात फेकण्यात आला असावा असे सांगण्यात येत आहे. मृतदेह रात्रभर नाल्याच्या पाण्यात राहिल्याने किड्यांनी चेहरा पूर्णत: विद्रूप केला होता. नेमका कुणी आणि कशासाठी खून केला याचा शोध पोलीस घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू