शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरखाली दबून तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 01:03 IST

सिमेंटचे विद्युत खांब घेऊन बारव्हा गावाकडे जात असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे एक्सल तुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉली उलटली. यात ट्रॉलीमध्ये बसलेल्या २१ वर्षीय तरुणाचा ट्रालीखाली दबून जागीच करूण अंत झाला.

ठळक मुद्देतिरखुरी शिवारातील घटना : एक्सल तुटल्याने अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कबारव्हा : सिमेंटचे विद्युत खांब घेऊन बारव्हा गावाकडे जात असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे एक्सल तुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉली उलटली. यात ट्रॉलीमध्ये बसलेल्या २१ वर्षीय तरुणाचा ट्रालीखाली दबून जागीच करूण अंत झाला. ही घटना काल रात्री ७.३० वाजताच्या दरम्यान लाखांदूर तालुक्यातील किटाडीजवळील तिरखुरी शिवारात घडली. शुभम रुपचंद मेंढे (२१) रा.जैतपूर असे मृत युवकाचे नाव आहे.या अपघातात राजकुमार भुरले व अनिल चौधरी हे दोघे किरकोळ जखमी झाले. शुभम हा तरुण लाखांदूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बी.ए. प्रथम वर्षाला शिकत होता. शिकण्याबरोबर मिळेल त्या मजुरीच्या कामावर जात होता. घटनेच्या दिवशी शुभम हा ट्रॅक्टरवर सिमेंटचे विद्युत खांब आणण्यासाठी दवडीपार येथे गेला होता. त्यावेळी चालक नाना डोये, शुभम मेंढे, जयश्री भुरले व अनिल चौधरी हे चौघे होते. ट्रॉलीमध्ये १० सिमेंटचे खांब मांडण्यात आले. दरम्यान किटाडीपासून एक दिड कि.मी. वर तिरखुरी शिवारात ट्रॉलीचे एक्सल तुटल्याने चाक वेगळा झाला. क्षणातच खांबासहीत ट्रॉली उलटली. त्यात ट्रॉलीत बसलेल्या शुभम याच्या डोक्यावर सिमेंटचे खांब येऊन ट्रॉलीखाली सापडला. त्यात शुभमचा जागीच मृत्यू झाला.आले. शुभमच्या मागे आई, वडिल व एक लहान बहिण आहे. शुभमच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Accidentअपघात