शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

पाल्यांना संस्काराचे बाळकडू पाजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2016 00:59 IST

विद्यार्थी दशेत आल्यानंतर पाल्यांना मार्गदर्शक करण्यापेक्षा त्यांना जन्मापासूनच संस्कारासह जीवनाचे उद्दिष्ट सांगा.

राजेंद्र महाडोळे : माळी समाजाचा गुणगौरव व विद्यार्थी मनोबल समारंभभंडारा : विद्यार्थी दशेत आल्यानंतर पाल्यांना मार्गदर्शक करण्यापेक्षा त्यांना जन्मापासूनच संस्कारासह जीवनाचे उद्दिष्ट सांगा. मोठे उद्दीष्ट सांगितल्यास किमान त्यापर्यंत मजल गाठता येईल. माळी समाज बांधवांनी व्यवसायासह समाजहितही जोपासावे, असे प्रतिपादन अखिल भारतीय माळी महासंघाचे विदर्भ संघटक अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय माळी महासंघ भंडाराच्या वतीने गणेशपुर येथे अखिल सभागृहात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व विद्यार्थी मनोबल मार्गदर्शन समारंभाचे आयोजन आज बुधवारला करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माळी महासंघाचे महासचिव अविनाश ठाकरे, खंडविकास अधिकारी मंजुषा भेदे, तुमसर पंचायत समिती सभापती कविता बनकर, पवन तिजारे, डॉ. श्रीकांत भुसारी, प्रकाश अटाळकर, मनोहर बारस्कर, केशवराव निर्वाण, कृष्णराव निर्वाण, कैलास जांगळे, अनिल डोंगरवार, माधुरी देशकर, विजय शहारे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना महाडोळे यांनी समाजबांधव मर्यादेत न राहता त्यांनी समाजोन्नतीसाठी सदैव तत्पर रहावे, असे आवाहनही यावेळी केले. दरम्यान कार्यक्रमाला खासदार नाना पटोले यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी, भंडारा महिला जिल्हा रुग्णालयाला सावित्रीबाई फुले महिला रुग्णालय असे नामकरण करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी ठाकरे यांनी, आपसातील मतभेद विसरून समाज बांधवांनी एकत्र यावे व विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव मिळावे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला यशवंत उपरीकर, लिलाधर बारस्कर, कुसूम कांबळे, संध्या निर्वाण, भागवत मदनकर, रमेश गोटेफोडे, रविंद्र खंडाळकर, रविभूषण भुसारी, अनिल किरणापुरे, नितेश किरणापुरे, अरूण भेदे आदींनी सहकार्य केले. संचालन ईश्वर निकुडे, वृंदा गायधने यांनी केले.(शहर प्रतिनिधी)