शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांनो, कामाला लागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 22:03 IST

भंडारा-गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक जबरदस्तीने लादून शासनाच्या व जनतेच्या पैशाचा अपव्यय होणार आहे. जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी कुठल्याही संकटाला न घाबरता कंबर कसून भारतीय जनता पक्षाला विजयी करण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरेशी यांनी केले.

ठळक मुद्देतारिक कुरेशी : भाजपा जिल्हा कार्यसमितीची विस्तारित बैठक

आॅनलाईन लोकमतभंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक जबरदस्तीने लादून शासनाच्या व जनतेच्या पैशाचा अपव्यय होणार आहे. जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी कुठल्याही संकटाला न घाबरता कंबर कसून भारतीय जनता पक्षाला विजयी करण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरेशी यांनी केले.लोकसभा पोटनिवडणूकीच्या पार्श्वभुमीवर भारतीय जनता पार्टी भंडारा जिल्हा कार्यसमितीची विस्तारित बैठक मंगलम सभागृह येथे घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते.बैठकीला विदर्भ विभाग संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. प्रकाश मालगावे, माजी खासदार शिशुपाल पटले, डॉ. युवराज जमईवार, आ. चरण वाघमारे, आ. बाळा काशिवार, आ. अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, लोकसभा प्रभारी बाळा आंजनकर, महामंत्री प्रशांत खोब्रागडे, ज्येष्ठ नेते धनंजय मोहकर, दादा टिचकुले, रामकुमार गजभिये, तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, भंडाराचे नगराध्यक्ष सुनिल मेंढे, धनवंता राऊत, निलीमा हुमने, मो. आबीद सिध्दीकी, निशिकांत इलमे, गिता कापगते, नेपाल रंगारी, मंगेश वंजारी, मतीन शेख शिवराम गिºहेपुंजे आदी उपस्थित होते.यावेळी भाजपा विदर्भप्रांत संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, आ. बाळा काशिवार,आ.अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, डॉ. उल्हास फडके आदींनी मार्गदर्शन केले. आगामी लोकसभा पोटनिवडणूक तयारी करिता जिल्ह्यात संमेलनाच्या आयोजनाची घोषणा यावेळी करण्यात आली असून सदर संमेलन शनिवार दि. २४ मार्च रोजी जनप्रतिनिधी संमेलन अखिल सभागृह भंडारा येथे होणार आहे.२९ मार्चला लाखनी येथे महिला मोर्चा संमेलन व ३१ मार्चला साकोली येथे अनुसूचित जाती मोर्चा संमेलन, दि. १ एप्रिल रोजी तुमसर येथे युवा मोर्चा संमेलन होणार आहे. मंडळ बैठकांचा कार्यक्रम सुध्दा जाहिर करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. युवराज जमईवार यांनी तर आभार प्रशांत खोब्रागडे यांनी मानले.