शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आयुध निर्माणीचे कामगार संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 21:53 IST

खासगीकरणाच्या विरोधात आयुध निर्माणीचे कर्मचारी आंदोलनात उतरले असून देशव्यापी संपात येथील जवाहरनगर आयुध निर्माणीचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवशी ९५ टक्के कामगार संपावर गेल्याने काम पूर्णत: ठप्प झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी येथे चोख बंदोबस्त लावला आहे.

ठळक मुद्देकामकाज ठप्प : खासगीकरणाच्या विरोधात देशव्यापी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : खासगीकरणाच्या विरोधात आयुध निर्माणीचे कर्मचारी आंदोलनात उतरले असून देशव्यापी संपात येथील जवाहरनगर आयुध निर्माणीचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवशी ९५ टक्के कामगार संपावर गेल्याने काम पूर्णत: ठप्प झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी येथे चोख बंदोबस्त लावला आहे.देशातील अग्रणी समजल्या जाणाऱ्या व सैन्य सामुग्रीचा पुरवठा करणाºया आयुध निर्माणीचे केंद्र सरकारने खासगीकरणाचा घाट घातला आहे. याचा परिणाम आंतरिक व बाह्य सुरक्षा यंत्रणेवर पडणार आहे. खासगीकरण थांबविण्यासाठी देशपातळीवरील ४१ आयुध निर्माणीमध्ये संपाची हाक देण्यात आली. त्यानुसार मंगळवारी जवाहरनगर आयुध निर्माणीतील बहुतांश कामगार या संपात सहभागी झाले. बीपीएमएस, आईएनटीयुसी, आयडीईएफ या संघटनांसह स्थानिक आयुध निर्माणी कर्मचारी संघ, न्यू एक्झ्प्लोझीव्ह फॅक्ट्री युनियन, आयुध निर्माणी एम्प्लॉईज युनियन, डेमोक्रेटीक मजदूर युनियन यांनी संयुक्त संघर्ष समितीच्या बॅनरखाली एक महिना संपाची घोषणा केली.त्यानुसार मंगळवार २० आॅगस्ट पासून १९ सप्टेंबर पर्यंत कामगार संपावर जाणार आहेत. विविध संघटनेचे पदाधिकारी कामगारांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करीत होते. त्यामुळे सुमारे ९५ टक्के कर्मचारी सहभागी झाले. सकाळी आंदोलनस्थळी तणाव निर्माण झाले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी रिना जनबंधू, ठाणेदार सुभाष बारसे, आयुध निर्माणीचे लेफ्टनंट कर्नल अभिजीत वैद्य आपल्या ताफ्यासह रात्रीपासून शॅडल पॉइंटवर डेरेदाखल आहेत. 

टॅग्स :Defenceसंरक्षण विभाग