लाखनी : गावाच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने गावपातळीवर विविध समित्यांचे गठण करण्यात आले. मात्र फाईलबंद समित्या बाहेर निघाल्याच नाही. याचा परिणाम ग्रामविकासावर जाणवू लागला आहे. यातून शासनाच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे.गावातील विविध समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याच्या मदतीला गावातील सुजाण जनतेची सोबत असावी, म्हणून शासकीय स्थळावरून ग्रामविकास समितीची स्थापना करण्यात येते. गावात स्वच्छता राहावी म्हणून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता समिती, पिण्याचे पाणी शुद्ध मिळावे, सांडपाणी व्यवस्थापन पाणी वापर व वसुली योग्य व्हावी म्हणून पाणी पुरवठा स्वच्छता समिती वनसंरक्षण वनसंवर्धनासाठी वनव्यवस्थापन समिती गावातील तंटे गावातच मिळावेत म्हणून महात्मा गांधी तंटामुक्त समिती, जलसंवर्धन मुद्रासंवर्धन तसेच उपजिविकेचे संसाधन निर्माण करण्यासाठी पाणलोट व्यवस्थापन समिती, मनरेगाच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी लेखाजोखा समिती, शैक्षणिक विकासासाठी शालेय स्तरावर शाळा व्यवस्थापन समितीचे गठण केले जाते. मात्र समिती स्थापन करण्याची कागदोपत्री पूर्तता होताच समितीचे काम थांबते अनेकदा ग्रामसभेत समिती स्थापन करण्याची पूर्तता होताच समितीचे काम थांबते. तर बऱ्याच वेळा समिती स्थापन करण्यावरून ग्रामसभेत गावातील राजकीय वातावरण थांबते. समितीवर योग्य व्यक्तीची निवड व्हावी म्हणून ग्रामसभेचा प्रयत्न असतो. मात्र राजकीय लोकमंडळी आपल्या मर्जीतील वर्णी लावतात. त्यामुळे सुजाण नागरिकांमध्ये निराशा दिसून येते. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम गावाच्या सर्वांगीण विकासावर होतो.या सर्व समित्याचे कार्य कागदापलिकडे सरकत नसल्याने सर्व समित्याचे कामे झाली आहेत. समित्या स्थापन झाल्यानंतर कारवाई दिसत नाही. त्यांना प्रशासकीय स्तरावरून मार्गदर्शन व मदत होत नाही. कामकाजाचा आढावा सुद्धा घेतला नाही. त्यामुळे समित्या स्थापन झाल्यानंतर त्याचे कार्य सातत्याने पुढे रेटले जाणे आवश्यक आहे. मात्र असे होत नाही. (तालुका प्रतिनिधी)
ग्रामविकास समित्यांचे कार्य अधांतरी
By admin | Updated: October 25, 2014 01:03 IST