शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
3
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
4
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
5
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
6
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
7
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
8
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
9
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
10
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
11
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
12
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
13
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
14
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
15
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
16
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
17
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
18
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
19
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
20
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

महिलांनी महिलांवर अत्याचार करु नये, तरच त्या सक्षम होतील

By admin | Updated: March 24, 2017 00:37 IST

महिलांवर अत्याचार करणारे पुरुषच आहेत असा महिलांवर अत्याचार करणारे पुरुषच आहेत असा समज पसरलेला आहे. परंतु जास्तीत जास्त कुटुंबाचा अभ्यास केल्यास ...

रामचंद्र अवसरे यांचे प्रतिपादन : महिला मार्गदर्शन शिबिरपवनी : महिलांवर अत्याचार करणारे पुरुषच आहेत असा समज पसरलेला आहे. परंतु जास्तीत जास्त कुटुंबाचा अभ्यास केल्यास महिलांकडून त्यांचा छळ अधिक होत असल्याचे लक्षात येते. त्यामुळे महिलांनी महिलांवर अत्याचार करु नये तरच त्या सक्षम होतील, असे प्रतिपादन आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले.एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पवनी अंतर्गत स्थानिक गांधी भवन येथे आयोजित तालुकास्तरीय महिला मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे यांनी भुषविले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सभापती अर्चना वैद्य, उपसभापती अल्का फुंडे, पं.स. सदस्या अस्मिता सलामे, माधुरी मेश्राम, वनिता नवधरे, गटविकास अधिकारी अनिता तेलंग, तालुका काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ब्राम्हणकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास मेश्राम ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदागवळी वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रभाकर लेपसे यांनी उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे यांनी विविध क्षेत्रात महिलांची होत असलेली प्रगती म्हणजेच महिला सक्षम होत असल्याची पावती आहे. कुटुंबातील सदस्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम महिलांचे आहे. त्यांनी बालकावर संस्कार करावे व मोठ्यांनी योग्य पध्दतीने वागले पाहिजे असा वचक निर्माण करावा असा सल्ला दिला. वैद्यकिय अधिकारी डॉ. मेश्राम, डॉ. नंदागवळी, डॉ. लेपसे यांनी बालकांचे कुपोषण टाळण्यासाठी मातेने घ्यावयाची काळजी याविषयावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात बालविकास प्रकल्प अधिकारी बी. वाय. निमसरकार यांनी तालुक्यात अंगणवाडी सेविका व आशा यांचे कार्य योग्य पध्दतीने सुरु असल्याने कुपोषित बालकांचे प्रमाण नगण्य असल्याचे मत व्यक्त करुन महिलांच्या प्रशिक्षण शिबिराची भुमिका विषद केली. बाम्हणी व चिचाळ येथील अंगणवाडीतील बालकांनी नृत्यगित सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. शिबिरादरम्यान बालकांचे आरोग्य तपासून त्यांचेवर करावयाच्या उपाययोजनांची माहिती मातांना देण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी बी. वाय. निमसरकार, संचालन सुनिल मोटघरे यांनी तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षीका शारदा वाकोडीकर यांनी केले. याप्रसंगी सांख्यिकी अधिकारी गोहत्रे पर्यवेक्षीका जाधव, हेडावू, पुराम, चिचखेडे, हुमने, वाहने उपस्थित होते. ग्रामीण भागातील अंगणवाडी कर्मचारी, आशा व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (तालुका प्रतिनिधी)