शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

महिला मजुरांची पं.स. कार्यालयात धडक

By admin | Updated: April 28, 2016 00:24 IST

बोरी येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत कामावर वाजवीपेक्षा जास्त कामे करूनही अत्यल्प मजुरी मिळत असल्याने काम बंद करून...

बोरी येथील प्रकार : रोहयोच्या अत्यल्प मजुरीची तक्रार, बोरी ते खापा पायदळ मार्चतुमसर : बोरी येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत कामावर वाजवीपेक्षा जास्त कामे करूनही अत्यल्प मजुरी मिळत असल्याने काम बंद करून ५६ महिला व १३ पुरुषांनी भर उन्हात बुधवारी सहा कि.मी. पायदळ पंचायत समिती कार्यालयात धडक दिली. खंडविकास अधिकाऱ्यांना तक्रार दिली. सदर कामावर नियमानुसार प्रथमोपचार पेटी, हिवरी नेट व पिण्याची पाणी नाही. उष्णतेच्या लाटेत महिलांचा जीव धोक्यात आला आहे. बोरी येथे म. ग्रा. रोजगार हमी योजनेअंतर्गत शालीक नंदूरकर ते शिशुपाल बोरकर यांचे शेतापर्यंत पांदन रस्त्याचे काम दि. २७ एप्रिल रोजी सुरु करण्यात आले होते. (तालुका प्रतिनिधी) मजुरीसाठी उन्हाची तमा नाहीया कामावर ५६ महिला व १३ मजूर कामावर आहेत. ७० ते ८० मिटरपेक्षा जास्त अंतरावरून माती नेऊन येथे घालावी लागत आहेत. ७० ते ८० मिटर पेक्षा जास्त अंतरावरून माती नेऊन येथे घालावी लागत आहे. पुरुष मजूर माती खोदकाम करतात तर महिला रस्त् यावर माती घालण्याची कामे करतात.जेवढे काम तेवढे दाम असा या योजनेचा नियम आहे. परंतु किमान १२५ ते १३५ रुपये मजुरी येथे पडणे गरजेचे आहे. तेव्हाच उष्णतेच्या लाटेत काम करण्याचा फायदा होईल असा प्रश्न या महिलांनी मांडला. या महिलांना ८० ते १०० रुपये मजुरी येथे मिळाली आहे. ७० ते ८० मिटर अंतर माती नेऊन घालण्यात वेळ येथे वाया जात असल्याने मजुरी कमी मिळण्याची शक्यता आहे.बुधवारी या महिला पुरुष मजुरांना काम बंद करून पायदळ पंचायत समिती कार्यालयात धडक दिली. खंडविकास अधिकाऱ्यांना तक्रार केली. बाजूच्या गावातील मजुरांना १५० ते १७० रुपये दर दिवशी मजुरी कशी मिळते असा सवाल या महिलांनी उपस्थित केला. येथे मजुरांना जॉब कार्ड अजूनपर्यंत प्राप्त झाले नाही असेही या महिलांनी 4सांगितले. नियमानुसार कामाच्या स्थळी पिण्याचे पाणी, प्रथमोपचार पेटी व हिरवी नेट अशा मूलभूत सोयती सुविधांचा अभाव आहे. ही बाबही या महिला मजुरांनी खंडविकास अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिली. यावेळी पं.स. गटनेता हिरालाल नागपुरे उपस्थित होते.रोजगार हमी कामावरील मजुरांना किमान १९३ रुपये मजुरी उपलब्ध होणे गरजेचे आहे. परंतु ती मिळत नाही. सकाळी ७ ते १२ व सायंकाळी ३ ते ५ अशा कामांच्या वेळा आहेत. अनेक ठिकाणी मजुरीची बोंब अनेक वर्षापासून सुरु आहे. परंतु त्यात सुधारणा शासनाने अजूनपर्यंत केलेली दिसत नाही.सखोल चौकशीची गरज(पान १ वरून) प्रकरणाची माहिती शासनाच्या आरोग्य खात्यातील वरिष्ठांना दिल्यास उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. चौकशी झाल्यास 'त्या' अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होणार याकडे नजरा लागल्या आहेत. (नगर प्रतिनिधी)मजुरांना जॉब कार्ड, प्रथमोपचार पेटी व पाण्याची सोय शुक्रवारपासून करण्यात येईल. मी स्वत: कामाच्या स्थळी भेट देऊन पाहणी करणार आहे. मजुरांवर अन्याय होणार नाही.- केशव गड्डापोडखंडविकास अधिकारी, तुमसर.