शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या ट्रकला कारची धडक, महिला डॉक्टर जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 16:48 IST

हा अपघात उमरेड-भिवापूर राज्य मार्गावर भिवापूरनजीक रविवारी रात्री दहाच्या सुमारास झाला.

ठळक मुद्देउमरेड-भिवापूर मार्गावर अपघातपुतण्या गंभीर जखमी

लाखांदूर (भंडारा) : नागपूर येथे शिकणाऱ्या मुलीची भेट घेऊन रात्री गावाकडे परतताना उभ्या ट्रकवर कार आदळून झालेल्या अपघातात तालुक्यातील बारव्हा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला डॉक्टर ठार, तर त्यांचा पुतण्या गंभीर जखमी झाला. हा अपघात उमरेड-भिवापूर राज्य मार्गावर भिवापूरनजीक रविवारी रात्री दहाच्या सुमारास झाला.

अस्मिता अशोक नंदेश्वर (वय ५७) असे मृत महिला डॉक्टरचे नाव आहे, तर सुमीत दौलत नंदेश्वर (३२, दोघे रा. बारव्हा) असे जखमी पुतण्याचे नाव आहे. रविवारी सुटी असल्याने डॉ. अस्मिता नंदेश्वर या नागपूर येथे आपल्या मुलीला भेटण्यासाठी गेल्या होत्या. रात्री बोलेरो कारने (एमएच ३६-एच ८२९८) परत येत होत्या. उमरेड-भिवापूर राज्य मार्गावर भिवापूरनजीक रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक कार चालवित असलेला पुतण्या सुमितला दिसला नाही.

त्यामुळे कार ट्रकवर जाऊन धडकली. एवढ्यात पाठीमागून आलेली दोन वाहनेही या कारवर येऊन धडकली. या भीषण अपघातात डॉ. अस्मिता यांचा जागीच मृत्यू झाला; तर पुतण्या सुमित याला उपचारासाठी नागपूर येथे रवाना करण्यात आले. अपघाताची माहिती बारव्हा येथे होताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने लाखांदूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू