शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

आला थंडीचा महिना, हिवाळ्यात आरोग्य सांभाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2021 05:00 IST

दिवसा घराबाहेर निघाल्यानंतरही काहीच त्रास होत नसून रात्रीला थंड वातावरणात शेकोटी जाळून बसण्याची मजा काही औरच असते. थंडीच्या दिवसांची मजा ग्रामीण भागात जास्त प्रमाणात लुटता येत असतानाच शहरी भागातही आता थंडीचा जोर वाढताच शेकोटी हमखास दिसून येते. शिवाय हिरवा भाजीपालाही मोठ्या प्रमाणात निघत असल्याने दिवसात खाण्यापिण्याची मजाच असते. असे असतानाच मात्र दमा, संधीवात व सिकलसेल रुग्णांसाठी हा हिवाळा त्रासदायी ठरतो.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  गत आठ महिन्यांपासून वातावरणातील बदलांमुळे आरोग्यावर परिणाम जाणवत आहे. आता तेथेच थंडीचे दिवस आरोग्यासाठी अत्यंत उत्तम राहत असून पौष्टिक खानपान व वातावरणात आरोग्यही चांगले असते. यामुळे सर्वांनाच हिवाळा हवाहवासा वाटतो. दिवसा घराबाहेर निघाल्यानंतरही काहीच त्रास होत नसून रात्रीला थंड वातावरणात शेकोटी जाळून बसण्याची मजा काही औरच असते. थंडीच्या दिवसांची मजा ग्रामीण भागात जास्त प्रमाणात लुटता येत असतानाच शहरी भागातही आता थंडीचा जोर वाढताच शेकोटी हमखास दिसून येते. शिवाय हिरवा भाजीपालाही मोठ्या प्रमाणात निघत असल्याने दिवसात खाण्यापिण्याची मजाच असते. असे असतानाच मात्र दमा, संधीवात व सिकलसेल रुग्णांसाठी हा हिवाळा त्रासदायी ठरतो. अशात या व्यक्तींनी जरा जपूनच वावरणे गरजेचे असते. यासाठी गरम कपड्यांचा वापर व स्वच्छ वातावरणात वावर या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. हिवाळ्याच्या दिवसात आबालवृद्धांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

हिवाळ्यात आहार कोणता घ्यावा? - हिवाळ्यात खाण्यापिण्याची खरी मजा असते. कारण हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात हिरव्या भाज्या निघतात. हिरव्या भाज्यांचे सेवन आरोग्यासाठी महत्त्वाचे असून यामुळे आपले आरोग्य निरोगी असते. तसेच मोसमी फळांचे सेवन आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवून शरीराला मजबूत बनविते. - तसेच या दिवसांत भरपूर पाणी प्यायला हवे तसेच रसदार पदार्थांचे सेवन करणे गरजेचे असते. हिवाळ्यात निघणाऱ्या सर्वच मोसमी पदार्थांची मजा घ्यावी. 

काळजी कोणी घ्यावी? - थंडीच्या दिवसात सर्वाधिक काळजी घेण्याची गरज असते ती दमा रुग्णांना. थंडीच्या दिवसांत धुळीचे प्रमाण वाढते तसेच वनस्पतींना फुलं येतात. अशात त्यांना लवकरच त्रास होतो. - सिकलसेल रुग्णांसाठीही हा काळ त्रासदायक असतो. कारण थंडीत रक्तवाहिन्या आखडतात व त्यामुळे रक्तप्रवाह मंदावतो. - संधीवात असलेल्या रुग्णांना अंगदुखीचा त्रास होतो. - अशात दमा रुग्ण व ज्यांना ॲलर्जी आहे अशा व्यक्तींनी शेतीची कामे टाळावी. मास्कचा नियमित वापर करावा तसेच धूळ व घरातील फोडणी आदींपासून बचाव करावा. - अशात रस भरलेले पदार्थ, मोसमी फळ व भाज्यांचे सेवन भरपूर प्रमाणात करावे. तसेच भरपूर पाणी प्यावे. दमा असलेल्या रुग्णांनी मास्कचा नियमित वापर करावा. 

 

टॅग्स :Winter Care Tipsथंडीत त्वचेची काळजी