घानोडच्या समस्या प्राधान्याने सोडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 06:00 AM2020-02-03T06:00:00+5:302020-02-03T06:00:43+5:30

ज्यात असलेले लोकशाही आघाडी सरकार लोकांच्या विकासासाठी कटिबद्ध असून साकोली विधानसभेचा आमदार व विधानसभा अध्यक्ष म्हणून आपण या भागाच्या विकासाला प्राधान्य देणार आहोत. घानोड वासीयांनी व्यक्त केलेली सर्व विकासकामे प्राधान्याने करण्यात येतील, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

Will solve Ghanod problem preferably | घानोडच्या समस्या प्राधान्याने सोडविणार

घानोडच्या समस्या प्राधान्याने सोडविणार

Next
ठळक मुद्देनाना पटोले : घानोड येथील जिल्हा परिषद शाळेतील वर्गखोलीचा लोकार्पण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्यात असलेले लोकशाही आघाडी सरकार लोकांच्या विकासासाठी कटिबद्ध असून साकोली विधानसभेचा आमदार व विधानसभा अध्यक्ष म्हणून आपण या भागाच्या विकासाला प्राधान्य देणार आहोत. घानोड वासीयांनी व्यक्त केलेली सर्व विकासकामे प्राधान्याने करण्यात येतील, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
घानोड येथील शाळा प्रगती पथावर असून शिक्षणामुळेच मानवाचा विकास शक्य आहे. या शाळेने जास्तीत जास्त गुणवान विद्यार्थी घडवून आपला नावलौकिक जिल्हाभर करावा, असे ते म्हणाले.
साकोली तालुक्यातील घानोड येथे सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळा वर्गखोलीचे लोकार्पण विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शाळेच्या स्नेहसंमेलनाचे उद्घााटन यावेळी करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य नेपाल रंगारी, सरपंच रजनी डोंगरवार, सभापती उषा डोंगरवार, जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते, मुख्याध्यापक साखरे, उपसरपंच दिलीप ठाकरे व शिक्षक उपस्थित होते. यावेळी नाना पटोले म्हणाले की, लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी कटिबद्ध आहे. धानाला ७०० रुपये बोनस जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळणार आहे, त्यासाठी ५१ हजार कोटी लागणार आहेत, सोबतच नियमितपणे कर्ज भरणाºयांना प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे.
ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव अध्यक्ष या नात्याने विधानसभेत मांडला व तो मंजूर करून घेतला. समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जातीनिहाय जनगणना होणे आवश्यक असल्याचे पटोले म्हणाले. अधिकाराचा व पदाचा उपयोग जनतेला न्याय देण्यासाठी करणार आहे.
प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक साखरे यांनी केले. समग्र शिक्षा अभियानात ही वर्ग खोली बांधण्यात आली आहे. या शाळेतून आतापर्यंत ३८३८ विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. शाळेस अ श्रेणी प्राप्त आहे. आयएसओ प्राप्त करण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. घानोड तलावाला भेट देऊन तो दुरुस्त करावा व पाणवठा बांधावा, रस्ते तयार करावेत, तुकडोजी महाराजांचा पुतळा उभारावा, अतिरिक्त दोन वर्ग खोल्या त्याचसोबत समाज मंदिर व सभामंडप बांधण्यात यावे अशी गावकºयांनी मागणी केली. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Will solve Ghanod problem preferably

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.