शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

३१ मार्चपूर्वी धान उत्पादकांना बोनसचा लाभ मिळणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 12:33 IST

Bhandara : जिल्ह्यात १.६५ लाखावर धान उत्पादकांची वाढली अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कआंधळगाव : खरीप हंगाम २०२४ करिता जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये पणन विभागामार्फत २३६ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या धान खरेदी केंद्रांच्या माध्यमातून १ लाख ६५ हजार ६६४ शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर नोंदणी केली आहे. या शेतकऱ्यांना बोनसचा लाभ मिळणार असला तरी तो ३१ मार्चच्या पूर्वी मिळणार का, हा मात्र प्रश्न आहे.

भंडारा हा धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात सातही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर धान शेती केली जाते. आधारभूत धान खरेदी केंद्रावर नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी २० हजार रुपये बोनस मिळणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय झाला असून लवकरच बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर ए ग्रेडला २,३२० रुपये तर सर्वसाधारण ग्रेडला २,३०० रुपयांचा हमीभाव शासनाकडून जाहीर करण्यात आला आहे. याच हमीभावात शेतकऱ्याला आपले धान विकावे लागते. परंतु मिळालेल्या हमीभावात शेतकऱ्यांना धान शेती परवडत नाही. त्यामुळे मागील चार वर्षापासून शासनाकडून धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन स्वरूपात बोनस दिला जातो. सुरुवातीला ही रक्कम क्विंटल मागे देण्यात येत होती परंतु मागील वर्षीपासून शासनाने यात बदल करून सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना हेक्टर मागे बोनस देण्यात येते.

हंगाम २०२४ करिता नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याची घोषणा केली. बराच काळ उलटून सुद्धा शासन निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांना बोनस मिळणार की नाही याबाबत मात्र शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अखेर २५ मार्चला बोनस मिळण्यासंबंधीच्या शासन निर्णय झाला असून त्यावर शिक्कामार्फत करण्यात आला आहे. 

पिक कर्ज भरण्याच्या कामी येईल का बोनस ?पीक कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता आहे. ३१ मार्च ही पीक कर्ज भरण्यासाठी शेवटची मुदत आहे. त्यासाठी शेतकरी धावपळ करत आहेत. धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारी बोनसची रक्कम ही पीक कर्ज भरण्यासाठी त्यांच्या उपयोगी पडणार का, असा सवाल शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :bhandara-acभंडाराPaddyभातCropपीक